उद्योजक, राजकारणी, पत्रकार ते साखर कारखान्याचा कार्यकारी संचालक..
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील किरण शेलार यांचा रोचक प्रवास..
झूम मराठी ऑनलाईन | व्यक्ती विशेष
पाचोरा येथील गूळ उद्योगाचे संचालक, पत्रकारिता (सकाळ – गावकरी वृत्तपत्राचे उप संपादक), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सरचिटणीस अशी विविधांगी ओळख असलेले किरण शेलार यांनी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या कार्यकारी संचालक पदासाठीच्या प्रतिष्ठित परीक्षेत यश संपादन करून नवीन बहुमान मिळविला आहे.
राज्यभारतील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदासाठी सरकारतर्फे वैकुंठभाई मेहता सहकारी प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यभारतील ३२५ पात्र उमेदवारची त्रिस्तरीय परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेरचा निकाल जाहीर करण्यात आला असून, उत्तर महाराष्ट्रातील एकमेव किरण शेलार यांनी या पदतलिकेत स्थान मिळवले आहे.
किरण शेलार हे जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक पदाधिकाऱ्यांपैकी एक असून, जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु व्हावेत, यासाठी त्यांनी विविध उपोषण आणि आंदोलने केली आहेत. किरण शेलार यांचे वडील साखर कारखान्यात एक कामगार होते. आयुष्यभर साखर कारखान्यात काम करणाऱ्या सामान्य कामगाराचा मुलगा कार्यकारी संचालक पदासाठीच्या परीक्षेत पात्र ठरल्याने त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
- लेखन – आबा सूर्यवंशी



