आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांच्या वेळेत बदल, शुभांगी पाटील यांच्या मागणीला मोठे यश…

शुभांगी पाटील यांनी आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक चौक व सचिव वाघमारे साहेब यांचे आभार मानले आहेत

धुळे | झूम मराठी ऑनलाईन | दिलीप परदेशी

राज्यातील आदिवासी विकास विभागा अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या वेळेत बदला संदर्भात शिक्षक व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी मागणी होती ती मागणी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी पाठपुरवठा केला आणि आश्रम शाळांच्या वेळेत बदला झाल्याने शिक्षक व कर्मचारी मध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

आदिवासी विकास विभागा अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या वेळेत बदला संदर्भात शिक्षक व कर्मचाऱ्यांची मागील अनेक वर्षांपासून वेळ बदलण्याची मागणी होती. कारण आश्रम शाळांच्या वेळा या सकाळी आठ पंचेचाळीस ते सायंकाळी चार वाजेपर्यंत होती. त्यामुळे शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना सकाळी सात वाजताच घरून निघून शाळेवर जावे लागत होते. त्याचप्रमाणे सायंकाळी देखील घरी पोचण्यास उशीर होत होता. त्यामुळे या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा संपूर्ण दिवस हा व्यस्त राहत असे व त्याचप्रमाणे सदरच्या वेळा या विद्यार्थ्यांना देखील योग्य नव्हत्या पूर्ण वेळ शाळा असल्याने मधल्या वेळेत लहान मुलांना देखील वर्गात झोप लागत असे त्यामुळे सदरची वेळ बदल करून राज्य शासनाच्या शाळांच्या वेळेप्रमाणेच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांच्या देखील वेळ करण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून शिक्षक व कर्मचाऱ्यांची होती.

यासंदर्भात अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी निवेदने प्राप्त झाली होती.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी नुकत्याच मागील आठवड्यात दिनांक 23/01/2025 रोजी आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक व आदिवासी विकास विभागाचे सचिव वाघमारे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या संदर्भात लेखी निवेदन सादर केले होते.

राज्यमंत्री महोदयांनी लवकरच या संदर्भात निर्णय घेण्याचे शुभांगी ताई पाटील यांना आश्वासन दिले होते. व त्याचीच पूर्तता करत आज दिनांक 03/02/2025 रोजी आदिवासी विकास विभागाने शासन निर्णय शा आ शा/2022/प्र क्र 240/का.13 काढून आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांच्या पूर्वीच्या वेळेत बदल करून शालेय शिक्षण विभागाप्रमाणे शाळांच्या वेळा सकाळी 11 ते सायंकाळी पाच या वेळेत केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळा वरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असून त्यामुळे राज्यभरातून शुभांगी ताई पाटील यांचे कौतुक होत आहे. या निर्णयाबद्दल महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक चौक व सचिव वाघमारे साहेब यांचे आभार मानले आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे