पाचोऱ्यातील अतिक्रमित घरांची मोजणी प्रक्रियेचा आ किशोर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ..
शहरातील सुमारे ३ हजार ५०० अतिक्रमित मालमत्ता धारकांना या योजनेचा लाभ मिळणार असून १९ टप्प्यात या अतिक्रमित घरांची मोजणी प्रक्रिया पार पडणार आहे..
पाचोरा | झूम मराठी ऑनलाईन | दिलीप परदेशी
पाचोरा शहरातील सुमारे ३ हजार ५०० अतिक्रमित मालमत्ताधारकांना अतिक्रमीत घरांचा लाभ मिळणार असून आमदार किशोर पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने शासकीय जागेवरील सुमारे ३ हजार ५०० अतिक्रमित घरे नियमानुकूल करून नावावर लावण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे.
मोजणीच्या कामाचे जनता वसाहत भागातील धम्मोदय बौद्ध विहारातून आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते सुरु झाली असून पहिल्या टप्यात २५० घरांची मोजणी झाली. २०११ पूर्वीची सरकारी जमिनीवरील रहिवासी क्षेत्रातील घरांचे अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे धोरण आहे. त्यानुसार नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक मोजणी फी भरून मोजणी प्रक्रिया सुरू केली. त्याचा साडेतीन हजार लाभार्थ्यांना मिळणार असून ते काम टप्याटप्याने केले जाणार आहे. या कामाची सुरुवात आमदार किशोर पाटील यांच्या हते झाली, दरम्यान गोरगरीब जनतेला आपण लाभ मिळून देणार असल्याचे आपल्यालामनस्वी समाधान आहे असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समिती सभापती गणेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, प्रवीण ब्राह्मणे, रवी पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतिक्रमित मालमत्ताधारकांनी या मोजणी प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले.



