वेरुळी खुर्द येथे विजेचा जोरदार झटका लागल्याने शेतकऱ्याच्या मृत्यू..!
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु| येथील शेतकरी भैया रमेश पाटील (वय३९) हे आज शेतात पिकाला पाणी देत असतांना अचानक विजेचा जोरदार झटका (इलेक्ट्रिक शॉक) लागल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द येथील शेतकरी भैया रमेश पाटील (वय३९) हे आज दुपारी शेतात गहूला पाणी देत असतांना त्या दरम्यान त्यांना इलेक्ट्रिल विजेचा झटका लागल्याने ते गंभीर जखमी झाले असता त्यांना पुढील उपचारासाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता ग्रामीण रुग्णालय डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत झाल्याचे घोषित केले पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्हार देशमुख हे करीत आहे.
दरम्यान डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले असून त्याचा शव त्याचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला तो अविवाहित असून त्याच्या पाच्छ्यात आई, वडील व एक बहीण असून तो अविवाहित होता माजी पोलीस पाटील रमेश दगडू पाटील यांचा तो मुलगा होता. यांच्या अकस्मात मृत्यू मुळे परिसरात हळहळ व्यक्त हॊत आहे.



