आता ग्रामपंचायत नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला लागायचंय?
ज्या कारणांमुळे या निवडणुका रखडल्या आहेत, त्यांचे वर्गीकरण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई – झूम मराठी ऑनलाईन
महाराष्ट्रात महायुतीला घवघवीत 237 जागांचे बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता राज्यभरातील रखडलेल्या ग्रामपंचायत नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, सहकारी संस्था, पंचायत समित्या यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल अशी तुमच्या मनातील जी अपेक्षा होती, ती आता फळाला आलेली आहे अर्थात राज्यात बहुमत मिळाल्याचा योगायोग म्हणा किंवा सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे म्हणा आता या निवडणुका लागणार आहेत.
देशभरातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात ज्या कारणांमुळे या निवडणुका रखडल्या आहेत, त्यांचे वर्गीकरण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्रात ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका रखडलेल्या आहेत. यावर आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
इशाद या संस्थेने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेताना देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका कशामुळे रखडलेल्या आहेत याची एकत्रित वर्गीकरण व आकडेवारी द्यावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.




