लोहारा विद्यालयात अक्कासाहेब प्रभावती गरुड यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन
- लोहारा प्रतिनिधी दिलीप राजपूत
लोहारा धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे दिनांक ८ डिसेंबर 2024 रोजी स्वर्गीय अक्कासाहेब श्रीमती प्रभावती गजाननराव गरुड यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुतळ्याचे पूजन संस्थेचे संचालक राजेंद्र शेळके यांनी केले त्यानंतर दिवंगत अक्कासाहेब प्रभावती गजाननराव गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके यांनी केले याप्रसंगी उमेश लक्ष्मणराव भोसले सुनिताताई राजेंद्र शेळके विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अ. अ. पटेल सर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती यु डी शेळके, उपमुख्याध्यापक एस व्ही शिंदे, पर्यवेक्षक पी एम सुर्वे, तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




