काकण बर्डी यात्रा भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोषात
जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यात काकणबर्डी ( Kakan Bardi ) चंपाषष्टीला खंडोबा यात्रोत्सव साजरा झाला असून पंचक्रोशीतिल भाविक, ग्रामस्थ बहुसंख्यने उपस्थित राहून भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत मोठया उत्साहात यात्रा सुरु आहे..
पाचोरा शहरापासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर व गिरड रस्त्याच्या उत्तरेस असलेल्या टेकडीवर पौराणिक कथेचा आधार असलेल्या व महादेवाच्या अनेक अवतारांपैकी खंडोबाचे मंदिर आहे. अख्यायिकेनुसार याच टेकडीवर खंडोबाने केलेल्या दुसऱ्या विवाहा हाताचे काकण सोडल्याने या टेकडीला काकणबर्डी असे नाव पडल्याची कथा प्रचलित आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंपाचष्टीला येथे भाविकांकडून मंदिरास रंगरंगोटी, रोषणाई, झेंडूची फुले, जय मल्हारच्या गजरात हळद- खोबरे उधळून मल्हारी मार्तंडची तळी उचलली जाते.
आरती व सदानंदाचा येळकोट येळकोटचा गजर भाविक घरोघरी करून भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य चढवला जातो. याच दिवशी काकणबर्डी टेकडीला यात्रेचे स्वरुप येते. या यात्रेस शेकडो वर्षांची परंपरा आहे. पूर्वी या टेकडीवर लहान पुरातन मंदिर होते. भाविकांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला व दानशुरांच्या सहयोगातून सभागृह असलेले मंदिर साकारण्यात आले.
तसेच जिल्हा परिषद अंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास निधीतून टेकडीवर चढण्यासाठी पायऱ्या व भाविकांसाठी भक्त निवास तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सोय केली आहे. आता स्थानिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी प्रयत्न करून मोठा विकास निधी उपलब्ध करून काय पालट होत आहे, विकास काम जोरात सुरु असून काही दिवसांत परिसरात विकास कामा अंतर्गत होईल असे सांगण्यात येत आहे..
यात्रेनिमित्त बाजरीची भाकर, कांद्याची पात टाकून केलेले वांग्याच्या भरताचा नैवेद्य देण्याची प्रथा असून खंडोबाच्या गजरात तळी उचलली जाते. यात्रेनिमिव टेकडीसह परिसरात लहान मुलांची खेळणी, उंच पाळणे, गरम गरम जिलेबी आणि भजी साठी ठेले लागले असतात, रसवंती, सरबत, थंड पेयाची दुकाने थाटली जातात. भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय शहरातील सामाजिक मंडळाकडून केली जाते.




