आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी..

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अखेर १० दिवसांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचं कोडं सुटलं आहे. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला उपस्थित आमदारांनी अनुमोदन दिलं आणि देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे निश्चित झालं. निकाल लागल्यानंतर भाजपाकडून सातत्याने सोशल मिडिया व राजकीय व्यासपीठांवरदेखील देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचं बिंबवलं जात होतं. अखेर त्यांच्या नावाची घोषणा झाली.

२०१९ साली मु्ख्यमंत्रीपदावरून सेना-भाजपा युती तुटली, तेव्हा नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसह भल्या सकाळी शपथविधी उरकला. पण अवघ्या ७२ तासांत त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहिल्याची नोंदही त्यांच्यानावे झाली. पण त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या भाषणात त्यांनी आपण पुन्हा येणार असल्याचे संकेत शायरीच्या माध्यमातून दिले होते. “मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समुंदर हूँ, लौट कर वापस आऊंगा”, असं फडणवीस म्हणाले होते. त्यांनंतरही त्यांनी आपण विरोधकांकडून आखण्यात आलेलं चक्रव्यूह भेदणारे अभिमन्यू असल्याचं विधान केलं होतं.

आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाल्यानंतर आता सत्तास्थापनेमध्ये खातेवाटप आणि सत्तेचं योग्य प्रमाणात मित्रपक्षांमध्ये वाटप करणं हे मोठं आव्हान देवेंद्र फडणवीसांसमोर असणार आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर केलेल्या आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी या ‘तडजोडी’चा उल्लेख करताना “आपल्याला सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. पण आपण एक मोठं ध्येय घेऊन राजकारणात आलो आहोत. फक्त पदांसाठी आलेलो नाही. त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा आहे की येत्या काळात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील, काही गोष्टी मनाविरुद्ध होतील. तरीही आपण सगळे व्यापक हितासाठी एकत्र काम करू”, असे संकेत त्यांनी दिले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे