आपल खान्देश

नानासाहेब प्रताप हरी पाटील ह्याच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजी राजे पाचोऱ्यात गरजले 

नानासाहेब प्रताप हरी पाटील या सुसंस्कृत माणसाला निवडून आणण्यासाठी उपस्थितांना केले आवाहन...


  • दिलीप जय परदेशी

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा भडगाव – विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ आज महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांची प्रचार सभा पाचोरा भडगाव रस्त्यावरील अटल मैदानावर घेण्यात आली

या सभेत रेकॉर्डब्रेक गर्दी झाली यावेळी पाचोरा भडगाव तालुक्यातील मतदारांची व नानासाहेब प्रतापराव पाटील यांच्यावर प्रेम करणारे मतदारसंघातील असंख्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी केली होती. गर्दीचा उच्चांक मोडल्याचे यावेळेस पहावयास मिळाला. सुरुवातीस शायरी पोवाड्याचे आयोजन उपस्थितांसाठी करण्यात आले होते. शायरी पोवाड्याच्या माध्यमातून उपस्थित मतदार संघातील मतदार बंधू भगिनी यांची पोवाडा गाऊन उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी राजे महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज, विद्येची देवता सरस्वती,महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसुर्य महाराणा प्रताप, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सुरुवातीस खानदेश हितसंग्राम पक्षाचे प्रवक्ते, बाळद ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते चंद्रकांत ठाकरे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते डॉ.धनंजय जाधव यांनी आपल्या मनोगत आतून पक्षाची भूमिका व ध्येय धोरणे विस्तृत स्वरूपात उपस्थित समोर मांडली.

प्रसंगी यावेळी अखिल भारतीय मराठा समाज संघाचा बिनशर्त पाठिंबाचे पत्र दिलीप पाटील व त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच खानदेशी संग्राम संघटनेच्या वतीने देखील सुरेश पाटील सह सर्व पदाधिकारी यांनी नानासाहेबांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ पाठिंबापत्र यावे देण्यात आले. नंतर संपूर्ण मतदारसंघांमध्ये ज्यांनी रॅलीच्या माध्यमातून कॉर्नर सभांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला अशा नानासाहेबांच्या कन्या डॉ. पूनमताई प्रशांत पाटील यांनी नानासाहेबांची उमेदवारी व त्यांनी केलेली कामे याची विस्तृत स्वरूपात माहिती उपस्थित मतदार बंधू-भगिनींना सांगितले. आगामी काळात जर आपण त्यांना संधी दिली तर त्याचे संधीचे सोने नानासाहेब केल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. पाचोरा भडगाव विधानसभा चे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांनी उपस्थितांना मतदान करण्यासाठीचे आवाहन केले आणि सांगितले की जसा तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला असाच विश्वास मला कायम द्यावा, मला ग्रामीण भागाचा चांगला अनुभव आहे, त्या भागाचा विकास करेल, आपण दिलेल्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही असे त्यांनी उपस्थित मतदार बंधू-भगिनींना आवाहन केले. आपण मतदान करावे असे त्यांनी सांगितले. शेवटी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय छत्रपती संभाजी राजे महाराज यांनी उपस्थितांना सांगितले की तर आपल्याला नानासाहेबांना उमेदवारी देणे गरजेचे आहे, आणि त्या माध्यमातून मी पहिल्यांदा कुठेही महाराष्ट्रात गेलो नाही, नानासाहेबांच्या फॉर्म भरण्यासाठी आलो, महाराष्ट्र मध्ये गलिच्छ राजकारण सुरू आहे जे महाराष्ट्राने केव्हा पाहिलं नाही, महाराष्ट्र हे शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा, महाराष्ट्र आणि या महाराष्ट्र मध्ये हे काय चालू आहे. महाराष्ट्राची ओळख शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांची आहे. राजकारणाचा जो खेळखंडोबा झाला आहे. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, हे काय चाललंय हा माझ्या पुढे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला.

प्रस्थापित उमेदवार तुम्हाला फसवायला लागले म्हणून तुम्ही ठरवायचं कोणत्या उमेदवाराला आपण साथ द्यायची आणि त्याला निवडून आणायचे उभाठा मध्ये प्रस्तावित आमदाराच्या बहिणी उभी आहे. त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही, तर दुसरीकडे मागच्या वेळेस अपक्ष उमेदवार जे कोण उभे होते ते कोणत्या पक्षाचे आहेत. हे तुम्हाला माहित आहेत. मागच्या वेळेस ते उभे राहिले आहे ते कोण कोणाचे उमेदवार आहेत आणि उद्या हे इलेक्शन झाल्यानंतर ते दोघे एकत्र राहणार की नाही ? हे गलिच्छ राजकारण हे बदलायचं नाही का ? आपण. आणि हे गलिच्छ राजकारण बदलायचं असेल तर त्याच्यासाठी स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे. यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती झाली आहे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज,शाहू ,फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा हा पक्ष आहे. आपल्याला पाहिजे तसं राजकारण करायचं, हे आपल्या राज्यामध्ये काका पुतण्यांचा राजकारण चालू आहे. आणि हे सगळे निवडून आल्यानंतर एकत्र येणार आहेत माझे शब्द लिहून ठेवा. हे सगळे खालच्या पातळीवरच राजकारण चालू आहे. विकासावर कोणीच बोलायला तयार नाही. काय असतात त्यांची राजकीय भाषण हे कुत्र? असे शब्द आपण ऐकायचे नसतात ते शब्द ह्या राजकारणाच्या तोंडून बाहेर पडत असतात, दोन-तीन महिन्यात काय सुरू झाले? लाडकी बहीण योजना महिन्याला पंधराशे रुपये देतात, महिलावर्ग खुश आहे, आपणही खुश आहात मला माहित आहे, चांगली गोष्ट आहेत , पण ही योजना पाच वर्ष अगोदर का तुम्ही राबवली नाही, तीन महिने अगोदर तुम्ही राबवत आहात, पुढे ही योजना राबवणार आहात का मला माहीत नाही, कुठून देणार आहेत मला माहित नाही, पण दिले आनंद आहे, कौतुक आहे पण हे पैसे कुठून येत आहेत तुम्हाला माहित आहेत का? आणि हे भाषा उपकाराची करतात आम्ही दिले, आम्ही दिले म्हणजे काय दिले. आपल्या जीएसटी मधूनच ते पैसे दिले. लाडकी बहीण योजना हा फसवण्याचा कार्यक्रम चालू आहे. म्हणून हुशार होण्यासाठी ही वेळ आलेली आहे. आता संकल्प पत्र काढलेले आहे, जाहीरनामा काढलेले आहे,कोणी काढलेले भाजपने काढलेले आहे. आम्ही आकांक्षा केंद्र उभे करू. अगोदर शिवाजी महाराजांचे जे स्मारक आहेत ते तर अगोदर व्यवस्थित करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहेत ते व्यवस्थित करा. ते काही केलं नाही. ज्याच्यातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढच्या पिढीला दाखवायचे आहेत ते तर अगोदर व्यवस्थित करा. इकडे फक्त महापुरुषांच्या जयजयकार करतात. शिवस्मारकाचे काय झाले? आणि उद्धव ठाकरे काय म्हणतात मंदिर बांधणार आहेत महाराष्ट्रात. म्हणून आपण सर्वांनी शहाणे होण्याची गरज आहे. आणि हा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आहे, आपल्या राज्यात सर्व खेळ खंडोबा चाललाय.

काल प्रचारफळेच्या वेळी माझ्या पायात चमक आली. माझ्याकडे औषध नव्हतं म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयात आपण जाऊया तेथे गेलो असता,येथील ग्रामीण रुग्णालय अतिशय गलिच्छ आहे. आणि हे खातं विद्यमान आमदारांच्या मंत्र्याकडे आहे. ग्रामीण रुग्णालयाची अवस्था पाहिली असता,एकही व्यवस्था नाही, गाद्या फाटलेल्या खिडक्या तुटलेल्या,ते पाहून मला वाईट वाटले. म्हणून आपण नानासाहेब प्रताप हरी पाटील सारख्या एक साध्या व्यक्तिमत्त्वाला आपण निवडून द्यावे, त्यांच्या वडिलांनी शाळा काढल्यात दहा-पंधरा हजार तरुण सुशिक्षित केलेत परंतु त्यांना रोजगार नाही, येथील तरुण पुणे, मुंबईला जातात, यासाठी चिंतन करा, पैसे वाटून मत विकत घ्यायचे का? यासाठी आपण आत्मचिंतन केले पाहिजे, आपण एवढ्या उन्हातानात आलात म्हणून आपले कौतुक करावेसे वाटते महिला भगिनी आपण ताराराणी सारखे आलेत, म्हणून त्यांच्यासारखं आपण लढूया महिला सबलीकरण करूया. इथे पाण्याची परिस्थिती काय आहे याची संपूर्ण कल्पना आपल्याला आहे. येथे वडीलधारी माणसे बसलेले आहेत. म्हणून वडीलधारी माणसांना माझी विनंती आहे. पाचोर्‍यामध्ये कसे राजकारण चालू आहे, कसे तुम्हाला फसवयला निघालेले आहेत, राजकारण किती गलिच्छ झाले आहे, परत ते आमदार जर निवडून आलेत. तर काय होईल? ग्रामीण रुग्णालय बघून या काय हालत झाली आहे, ग्रामीण रुग्णालय बघितल्यानंतर तुम्हाला समजेल ,तुमचा काय विकास झालेला आहे, पत्रकार बंधुंनो तुम्ही सुद्धा कसे गप्प आहात,तुम्ही का छापले नाही, मी ते पाहिल्यानंतर तर मला उलटी आली, तेथील डॉक्टरांना विचारले असता, हॉस्पिटलला पावसाळ्यात गळती लागली होती म्हणून अशी परिस्थिती झाली आहे, असे सांगण्यात आले म्हणून,या सर्व टग्यांना आपल्याला बाहेर काढायचे आहे. आणि या दिलदार माणसाला आपल्याला निवडून द्यायचे, हा माणूस टग्या दिसतो का?हे माजलेले ढगे कसे दिसतात तिकडे? आणि म्हणून तुम्हाला नानासाहेब यांना निवडून द्यायचे का ? त्या टग्यांना निवडून द्यायचे? हे आपण ठरवायचे आहे . आणि येणाऱ्या २० तारखेला पेनाच्या नीपवर आपले बटन दाबून सुसंस्कृत माणसाला आपण निवडून द्या असे आवाहन शेवटी त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक भोसले यांनी केले. व्यासपीठावर पाचोरा भडगाव तालुक्यातील, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभेचे विराट स्वरूप बघावयास मिळाले आत्तापर्यंतच्या सभांचे रेकॉर्ड ब्रेक सभा बघावयास मिळाली हे या सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे