भडगाव तालुक्यात महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात..
गुढे व वाडे किशोर आप्पांचे जंगी स्वागत..
- दिलीप जय परदेशी.
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला वेग आला आहे. पाचोरा भडगाव मतदार संघात बहुतांश उमेदवारांनी आपली प्रचार कार्यालये सुरु केली असून महायुतीचे उमेदवार किशोरआप्पा पाटील यांच्या उपस्थितीत घरोघरी प्रचाराला आता सुरुवात झाली आहे.
भडगाव तालुक्यात गुढे परिसरात आमदार तथा महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज झंझावाती प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत गुढ्यातील तरूणांसह अबालवृध्द सहभागी होत किशोर पाटलांच्या विजयाची मोट बांधली.
भडगाव तालुक्यातील गुढे येथे सकाळी नऊ वाजता रॅलीला सुरवात झाली. बस स्थानकापासून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादनाने सुरुवात झाली. त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संत सावता महाराज मंदिर, भवानी मंदिर, संत नरहरी चौक, संत सेना महाराज मंदिर आदि भागात ही रॅली काढण्यात आली. रॅलीला गुढेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले. तर तरूणासंह वृध्दांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा देत विजयाची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परीषदेचे विकास पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील, बाजार समितीचे उपसभापती पी.ए.पाटील, पथराडचे भाऊसाहेब पाटील, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, युवराज पाटील, कोठलीचे समाधान पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील,उपाध्यक्ष देविदास माळी, कृउबाचे माजी उपसभापती विश्वास पाटील, गुढ्याचे सुमित पाटील, राहूल पाटील, आबा फौजी, प्रविण पाटील, प्रकाश हीरे, भगवान पाटील, शिंदिचे योगेश पाटील, गुलाब पाटील, नारायण पाटील, भाऊसाहेब पाटील, वसंत पाटील , पिचर्डेचे संजय पाटील, वाड्याचे परशुराम माळी, कनाशीचे अरूण पाटील, रविंद्र महाजन, बंटी राजपूत, भानुदास महाजन, माधवराव पाटील, अनिल महाजन आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



