अमोल पंडीतराव शिंदे यांच्या प्रचारार्थ नगरदेवळा शहरात निघालेल्या रॅलीला उसळला जनसमुदाय..
- दिलीप जय परदेशी.
पाचोरा भडगाव विधानसभा निवडणूक प्रचाराला वेग आला असून प्रत्येक उमदेवार हायटेक प्रचार करत आहे काल अपक्ष उमदेवार अमोल पंडीतराव शिंदे यांच्या प्रचारार्थ नगरदेवळ्यात निघालेल्या रॅलीला प्रचंड जनसमुदाय उसळला होता.
पाचोरा विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार अमोल पंडीतराव शिंदे यांच्या प्रचार दौऱ्याला वेग आला असून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया अमोल शिंदे यांनी व्यक्त केली.
काल मध्ये नगरदेवळ्यात रॅली व नागरिकांची भेट, कॉर्नर सभा माध्यमातून उमदेवार अमोल शिंदे ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच गावभेट दौऱ्यात युवक, महिला, वयोवृद्ध नागरिक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार वर्ग अमोल भाऊ शिंदे यांना प्रतिसाद देताना दिसून आले.
सर्वसामान्य माणसांच्या सुख दु:खात सहभागी होणारा आपला उमदेवार असून यंदा जनता मला संधी देईल. नक्कीच निवडून येणार असल्याची प्रतिक्रिया अमोल शिंदे यांनी दिली. गावोगावी अमोल शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे फटाक्यांचे आतषबाजी करीत सामान्य नागरिक यांच्याशी जनसंवाद करताना विकासाच्या मुद्द्यावर बोलत असताना या भागाचा कायापालट करू असे आश्वासन देत आहेत.



