आपल खान्देशब्रेकिंग

अखेर… भामरे ता चाळिसगाव येथील माजी सरपंच सौ भारती पाटील यांचे विरुद्धचा विवाद अर्ज फेटाळला

 

जळगाव (झूम मराठी ऑनलाईन) भामरे .ता चाळिसगाव येथील ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व सदस्या प्रा. भारती दिपक पाटील यांनी व कुटूंबातील व्यक्तिनि सरकारी जागेवर अतिक्रमण करून सरकारी जागेचा वापर करीत असल्या बाबत त्यांना सदस्य पदावरून अपात्र ठरविण्यात यावे. म्हणुन सरपंच लिंबादास ह्यालिंगे यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर चौकशी होऊन, स्वतः शासकीय जागेवर अतिक्रमण केले नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. यांनी त्यांचे विरुद्ध चा विवाद अर्ज फेटाळून लावला आहे. व सदस्य पद कायम ठेवले आहे.

प्रा.भारती पाटील यांचे पती दिपक आधार पाटील यांचे नावे खासगी मालमत्ता क्रमांक 45 चे क्षेत्रफळ 700 चौ. फुट. मिळकत असुन, त्या चाळिसगाव येथे नौकरी निमित्ताने वास्तव्यास आहेत. यामुळे त्या कुटुंबा पासून विभक्त राहत असल्या कारणामुळे अतिक्रमणासी त्यांचा स्वताचा प्रत्यक्ष संबंध दिसून येत नाही. त्यामुळे प्रा.भारती पाटील यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ( जे ३)च्या तरतुदींचा भंग केलेला नाही.म्हणुन जिल्हाधिकारी जळगाव यांनी विवाद अर्ज क्रमांक 82/024 चा तक्रार अर्ज फेटाळला आहे. या निकाला कडे परिसराचे लक्ष लागून होते. सोमोरील पक्ष प्रा. भारती पाटील यांच्यातर्फे अँड. विश्वासराव भोसले (पिंपरखेडकर) यांनी काम पाहिले. या निकाला मुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे