छत्रपती संभाजी भोसले यांच्या उपस्थितीत प्रताप हरिराव पाटील स्वराज्य पक्षातुन उमेदवारी अर्ज दाखल
- दिलीप जय परदेशी.
भडगाव (झूम मराठी ऑनलाईन) ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ची पाचोरा-भडगाव विधानसभेची उमेदवारी प्रताप हरी पाटील यांना जाहीर करण्यात आली असून, त्यांना निवडणूकीचा एबी फॉर्म देण्यात आला. यामुळे पाचोरा भडगाव मतदारसंघात चुरस वाढली असून मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी होणार आहे.
परिवर्तन महाशक्तीमधून तिसरी आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सोबत न जाता परिवर्तन महाशक्तीमध्ये माजी खासदार संभाजी राजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहार संघटनेचे बच्चू कडू आदी नेत्यांनी एकत्रित महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीकडून उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत. त्यात पाचोरा भडगाव विधानसभेत प्रताप हरी पाटील यांना स्वराज्य पक्षातुन उमदवारी मिळाली असून ते येत्या 29 तारखेला भडगाव येथून उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत, यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले येणार असून मोठया प्रमाणात जय्यत तयारी सुरु आहे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले प्रताप हरी पाटील ह्यांनी मीच पुढील आमदार असेन व मला मानणारा मोठा गट या मतदार संघात आहे त्यामुळे मला हि निवडणूक सोपी जाईल माझ्या उमेदवारी भरण्यासाठी जास्त संख्येने यावे असे आवाहन पत्रकार परिषदेत केले.
काही दिवसापूर्वी प्रताप हरी पाटील यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षात संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच स्वतः संभाजीराजे छत्रपती हे मतदारसंघात प्रचाराला येतील अशी माहिती देण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, डॉ. पूनम पाटील, गणेश सोनवणे, चेतन पाटील, प्रतिक पाटील उपस्थित होते.
- कोण आहेत प्रताप हरि पाटील
पाचोरा भडगाव तालुक्यात सामाजिक कार्यात ओळख असेलेले प्रताप हरि पाटील हे कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांचे सुपूत्र असून यांनी आपल्या कर्तृत्वाने भडगावच नव्हेतर सबंध जळगाव जिल्हयात आपल्या कार्याची मोहोर उमटवली आहे. हरि पाटील यांनी किसान शिक्षण संस्थेची भडगाव तालुक्यात सन १९६२ साली स्थापना केली. त्यानंतर १९९९ पासून संस्थेच्या चेअरमन पदाची धुरा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रताप हरि पाटील हे सांभाळत आहे, सामाजसेवेचा वासा असणारे प्रताप हरि पाटील हे नेहमी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यांना उमदेवारी मिळाल्याने भडगाव व पाचोरा तालुक्यातील त्यांना मानणारा गताट उत्साहाचे वातावरण आहे.



