भाजपा भटके विमुक्त आघाडी कोकण विभाग दौऱ्यातमहाड येथे येथे सामाजिक बैठक.
महाड (झूम मराठी ऑनलाईन) रायगड जिल्ह्यातील महाड येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पदाधिकारीची सामाजिक विचार विनिमय बैठक संपन्न झाली.
या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा भटके विमुक्त आघाडी कोकण विभाग अध्यक्ष सतीश गिरी कोकण विभाग सरचिटणीस अँड योगेश परदेशी यांच्या उपस्थितीत महाड येथे मोठया उत्साहात भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पदाधिकारीची सामाजिक विचार विनिमय बैठक झाली.
या बैठकीला प्रमुख पाहुणे भाजपा भटके विमुक्त आघाडी कोकण विभाग अध्यक्ष सतीश गिरी, सरचिटणीस ॲड. योगेश परदेशी, तसेच प्रदेश महामंत्री महिला मोर्चा डॉ मंजुषा मोती या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. युवा जिल्हाध्यक्ष रायगड मनोज जी पवार, पोलादपूर तालुका अध्यक्ष संदिप जी मोहिते, महाड तालुका अध्यक्ष बजरंग जी पवार, माणगाव तालुका अध्यक्ष संदिप पवार कल्याण लोकसभा संयोजक महेंद्र परदेशी आदि उपस्थित होते

