आपल खान्देशआरोग्य व शिक्षणकृषीवार्ताकोकणब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रराजकीयविदर्भसखी

Maharashtra Weather Update : राज्यात पाऊस करणार कमबॅक; हवामान खात्याचा अलर्ट..!

राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने आज २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. (Maharashtra Weather Update) 

कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट

 पुढील २४-४८ तासांत पावसाचा जोर वाढणार आहे. खालीलप्रमाणे विभागवार यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

  • कोकण विभागात हलका ते मध्यम पाऊस : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, जोरदार पाऊस व विजांचा कडकडाट: रत्नागिरी,,सिंधुदुर्ग
  • पश्चिम महाराष्ट्र- वादळी वारे, विजांचा कडकडाट व पाऊस : पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे घाटमाथा
  • मराठवाडा- हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस : छत्रपती संभाजीनगर, जालना, वादळी वारे व विजांसह पाऊस : परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव.
  • उत्तर महाराष्ट्र – हलका पाऊस : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव
  • वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता : अहमदनगर
  • विदर्भ- वादळी वाऱ्यांसह पाऊस : नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ

 

  • शेतकऱ्यांसाठी सल्ला

राज्यात पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

फवारणीचे काम पुढे ढकलावे.

शेतातील निचऱ्याची व्यवस्था करून पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे