ब्रेकिंग

पाचोरा तालुक्यातील नांद्राच्या जि प शाळा अस्वच्छ? परिसरात घाण, दुर्गधी..! मनसेने सफाई करण्याचे दिले निवेदन..

  • झूम ऑनलाईन न्यूज

पाचोरा तालुक्यातील नांद्रा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली दुर्गंधी आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली.

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील जिल्हा परिषदेची शाळा हीच ती शाळा काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचा दोन नंबरचा क्रमांक प्राप्त झाला होता आणि आज शाळा परिसरात दुर्गधी, घाण, कचरा  शाळेच्या आवारात वाढलेले गवत आणि विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या याकडे लक्ष वेधले असून संबंधित  प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष घालून संपूर्ण परिसर तात्काळ स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर जिल्हा परिषद शाळेत नियमित स्वच्छता ठेवण्यासाठी ग्रामपंचायतकडून विशेष पथक वा कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. सांडपाण्याचा निचरा होईल अशी योग्य व्यवस्था करण्यात यावी, घाण व दुर्गंधी टाळण्यासाठी कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छालय त्वरित खुले करावे, विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व शिक्षणाच्या वातावरणावर याचा विपरीत परिणाम होत असून, यावर तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण विठ्ठल दुंदुले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ओमराव सूर्यवंशी, पाचोरा शहराध्यक्ष निलेश मराठे, आकाश बोरसे व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे