आपल खान्देशब्रेकिंग

रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा भुंजेरिया (धान्यसन) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे गावात गढरिया धनगर समाजाचा पारपांरिक भुंजेरिया (धान्यसन) उत्सव मोठया उत्साहात रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात आला. या भुंजरियानां गढरिया धनगर समाजात मोठा मान आहे.

खान्देशात विशेषतः जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात आखतवाडे, बदरखे मोहळाई तसेच धुळे तालुक्यात कुसुंबा व मराठवाडा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ठीक ठीकाणी  गढरिया धनगर समाज वास्तव्यस असून हा आनंदाचा सन म्हणजेच  भुंजेरिया (धान्यसन) उत्सव मानला जातो, यासाठी श्रावण मासात नागपंचमी च्या दिवशीं घरांमध्ये विविध प्रकारच्या धान्यची पेरणी केली जाते. नंतर रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी भुंजरीया अर्थात धान्य बाहेर काढल्या जातात, आणि सामाजिक कार्यक्रम घेऊन, समाजातील विशेषकाम करणाऱ्यास गौरवण्यात येते, गुणवंत विध्यार्थीचा कौतुक करण्यात येतो.

आखतवाडे गावात संध्याकाळी एकत्रित येऊन पेरलेल्या भुंजेरिया दाखण्याचा कार्यक्रम झाला समजबंधवांनी भुंजरियाचे दर्शन घेत पूजा केली गेली, वाजत गाजत नदीत धुतल्या  आणि सर्वप्रथम ते गावातील देवाला अर्पण केले करून. यानंतर, लोक एकमेकांपासून भुजरियाची धान्याची देवाण घेवाण करून, आपण केलेल्या चुका विसरून एक मेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या..

भुजंरिया सन साजरी करण्यासाठी आणि लहान मुलांना नवीन मित्र बनवण्यासाठीही या सणाला विशेष महत्त्व आहे. संध्याकाळच्या वेळी लोक नवीन कपडे घालून या सणाचा आनंद घेताना दिसतात. कुस्त्यांचे आयोजन केले जाते, विविध प्रादेशिक पक्ष आणि पक्षांद्वारे विविध ठिकाणी भुजारिया मिलन सोहळे देखील आयोजित केले जातात. भुंजरिया सणाच्या निमित्ताने महिलांची उपस्थिती लक्षनीय असते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे