लोहारा -ऋषिदेव रस्ता कडे प्रशासन लक्ष देईल का?
लोहारा -ऋषिदेव रस्ता केव्हा दुरुस्ती करणार? अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी. लोकप्रतिनिधी कडून फक्त दिले जाते खोटे आश्वासन रस्त्याची दुरावस्था थांबवा शेतकऱ्यांची आर्त:हाक..!
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे मोठी बाजारपेठ आहे. विशेषतः भाजीपाला मार्केट साठी लोहारा गाव सुप्रसिद्ध आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून याच गावातील शेतकऱ्यांची थट्टा होतांना दिसून येत आहे.
सविस्तर वृत्त असे की,लोहारा येथून ऋषिबाबा (रोटवद,ता.जामनेर) जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या परिसरात अनेक शेतकऱ्याने शेत आहेत. तसेच हा रस्ता अत्यंत पौराणिक असणाऱ्या ऋषी बाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडला जातो.
मागील वर्षीही दिशा लाईव्ह न्यूजने या रस्त्या संदर्भात अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते. मात्र संबंधित अधिकारी,- पदाधिकारी यांनी केवळ वेळ मारून नेली आहे. आजपर्यंत त्यांनी कोणताच पाठपुरावा केलेला नाही,फक्त शेतकऱ्यांना खोटी आश्वासन देऊन वाटाण्याच्या अक्षता शेतकऱ्यांच्या हातात दिल्या जातात.
हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असुन आता तर या रस्त्याने चालणे मुश्कील झाले आहे.
किमान आतातरी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देऊन या रस्त्यावर खडी, मुरूम टाकून रस्ता चालण्या योग्य करून घ्यावा. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी अगदी स्वखर्चाने याच रस्त्यावर दगड गोटे, मुरूम टाकले होते. तरीही झोपेचं सोंग घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अजून पर्यंत जाग आलेली नाही. शेतकरी संतप्त झाले असून त्वरित या रस्त्याला दुरुस्त करण्यात यावे,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



