ब्रेकिंग

लोहाराच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मनमानी कारभार…!

बँकेत ग्राहकाचे काम वेळेवर न होता सतत हेलपाटे मारावे लागत असल्याने, सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे..


पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे सेंट्रल बँकेची शाखा आहे या शाखेत परिसरातील सात ते आठ खेड्यांच्या लोकांचा आर्थिक व्यवहार शाखेतून चालतो, शासकीय योजनेच्या निराधार योजना संदर्भातील खाते सुद्धा या शाखेत असल्याने शासकीय नियमानुसार निराधार योजना व विविध योजनेच्या लाभधारकांना खात्याशी मोबाईल नंबर लिंक करण्याचे सांगण्यात आले आहे परंतु सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर शासनाकडून मिळणाऱ्या संजय गांधी निराधार, विधवा महिला, वृद्धपकाळ योजना, अशा विविध योजनेच्या लाभधारकांना मॅनेजर व कर्मचारी चांगल्या प्रकारची वागणूक न देता उद्या या परवा या अशा उर्मट भाषेत बोलून त्यांना शाखेत हेलपाटे मारायला लावतात आज दिनांक 15 रोजी पत्रकार चंदू खरे आपल्या आईच्या खात्याला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आई सोबत गेले असता आज तुमचे काम होणार नाही तीन दिवसांनी या असं मॅनेजर साहेबांनी सांगितलं असता तीन दिवसांनी का यायचं याच कारण विचारलं असता मॅनेजर सुतार साहेब यांनी पत्रकार चंदू खरे यांना अरेरावी करत सांगितल की आम्ही सांगू त्याच पद्धतीने काम होईल, लोहारा शाखेत अशा प्रकारे ग्राहकाचे काम वेळेवर न होता हेलपाटे मारावे लागत असल्याने, नागरिक त्रस्त झाले आहे संबंधित मॅनेजर वर कडक कारवाई करून त्याची बदली करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे, खाते धारकांशी प्रेमळ वागुन त्यांचे काम वेळेवर करून देणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी अशी परिसरातून मागणी होत आहे.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे