आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

Dr Babasaheb Ambedkar Jayanti | आंबेडकर जयंती का साजरी केली जाते?

आंबेडकर जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. या दिवसाची सुरुवात जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी केली. 14 एप्रिल 1928 रोजी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये (constitution of India) आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते केवळ मागासवर्गीयांच्या हक्कांसाठीच लढले नाहीत तर पक्षपात आणि जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारकही होते. आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी भारतीय राज्यघटनेचा (Indian Constitution) मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्व केले होते. जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदा आणि न्यायमंत्री (Minister of Law and Justice) म्हणून काम केले. आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती साजरी (Ambedkar Jayanti significance) केली जाते. त्यामुळे आंबेडकर जयंतीचे महत्त्व आणि इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. आजचा लेख याच विषयावर आहे. भीमराव आंबेडकर यांची जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2022) का साजरी केली जाते आणि त्याचं महत्त्व काय? हे आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत.

  • आंबेडकर जयंतीचा इतिहास (Bhimrao Ambedkar’s birthday)

14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.

  • आंबेडकर जयंतीचे महत्त्व (Importance of Ambedkar Jayanti)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या समान हक्कासाठी संघर्ष करत लढा उभारला. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी दूर ठेऊन सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. आंबेडकर राज्यसभेत दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. डॉ. भीमराव आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 1907 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात बी.ए. पदवी घेतली. यानंतर त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्कमध्ये मास्टर्स ऑफ आर्ट्ससाठी प्रवेश घेतला आणि 1927 मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी केली. 1916 मध्ये त्यांनी ग्रेज इन येथे बार कोर्ससाठी प्रवेश घेतला. यासोबतच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात आणखी एक डॉक्टरेट पदवी पूर्ण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 64 विषयात मास्टर्स होते आणि त्यांना 11 भाषां लिहिता वाचता आणि बोलता येत होत्या. ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि दलित नेते होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पार्श्वभूमी (Background of Dr. Babasaheb Ambedkar)

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू (मध्य प्रदेशातील हे गाव आता अधिकृतपणे डॉ. आंबेडकर नगर म्हणून ओळखले जाते) येथील लष्करी छावणीत झाला. सुभेदार पदावर असलेले सैन्य अधिकारी रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई सकपाळ यांचे ते 14वे आणि शेवटचे अपत्य होते. त्यांचे कुटुंब आधुनिक महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील अंबाडवे या गावातील मराठी पार्श्वभूमीचे होते. आंबेडकरांचा जन्म एका महार (दलित) जातीत झाला होता. त्यावेळी त्यांना अस्पृश्य मानले जात होते. त्यांच्यासोबत सामाजिक-आर्थिक भेदभाव केला जात होता. आंबेडकरांच्या पूर्वजांनी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात दीर्घकाळ काम केले होते आणि त्यांच्या वडिलांनी महू छावणी येथे ब्रिटिश भारतीय सैन्यात सेवा केली होती.

(लेखात दिलेली माहिती हे उपलब्ध स्त्रोतांच्या आधाराव दिलेली आहे)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे