राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रेखाटले सुंदर पोट्रेट चित्र
१४ एप्रिल रोजी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची १३२ वी जयंती भारतासह संपूर्ण जगात एक उत्सव म्हणून साजरी केली जाते आंबेडकर जयंती हा ‘समता दिन’ आणि ‘ज्ञान दिन’ म्हणूनही साजरा केला जातो, कारण आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष करणाऱ्या डॉ. आंबेडकरांना समतेचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. याच निमित्ताने श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था पाचोरा संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय पाचोरा येथील कलाशिक्षक आबासाहेब काशिनाथ महाले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर रेखाटलेले पोट्रेट चित्र सदरचे पोट्रेट चित्र पाहून श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ सन्माननीय प्रदीप एम. पांडे बडेसर यांनी कलाशिक्षक ए.के महाले सर यांनी रेखाटलेले महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोट्रेट पेंटिंग पाहून त्यांचे भरभरून कौतुक केले.



