आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

लोहारा विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


  • दिलीप राजपूत

लोहारा धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे 14 एप्रिल 2024 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

भरतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष पि यू खरे सर यांनी केले, याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ यु डी शेळके मॅडम पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर व पालकांमधून म्हसास येथील योगेश भाऊ पाटील विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनी अनुजा योगेश पाटील हिने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील उपशिक्षक आर के सुरवाडे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. विद्यालयाचे उपशिक्षक व्ही बी इंगळे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी माहिती उपस्थिताना दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष पीयू खरे सर यांनी आपल्या मनोगत होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा प्रतीक केलेले सामाजिक कार्य व संविधान याविषयी माहिती दिली व गीत सादर केले विद्यालयाचे पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान व त्यांनी दिलेला मंत्र याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन पाटील सर यांनी केले व आर के खोडपे सर यांनी आभार मानले यावेळेस विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे