अटकेपार झेंडा फडकवणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव चांदवडनगरीत उत्सवात साजरा..
चांदवड (झूम मराठी) हिंदूस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार- मल्हारराव होळकर यांचा 331 वा जन्मोत्सव सोहळा ऐतिहासिक नगरी चांदवड येथे थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष होळकरशाहीचे 16 वे वारसदार महाराजा श्रीमंत यशवंतराव शिवाजीराव होळकर, तळोदा संस्थांचे जगीरदार अमरजीत राजे बारगळ यांचा सह होळकर शाहीचे सर्व राजे यांच्या उपस्थित संपन्न झाला.

तळोदा संस्थान चे जहागीरदार- अमरजित राजे बारगळ, प्रा. यशपाल भिंगे, होळकर संस्थाचे गाडे अभ्यासक रामभाऊ लांडे, प्रदेश सचिव – धनगर समाज संघर्ष समिती – ज्ञानेश्वर परदेशी, सोशल मीडिया प्रदेश प्रमुख व अहिल्यावर्ताचे सपादक सुनील धनगर, प्रदेश उपाध्यक्ष – उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ- संदीप दादा लांडगे, जळगाव जिल्हा संघटक – संजय गढरी, यांच्या सह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक मान्यवरांची उपस्तिथी होती, कार्यक्रमाचे आयोजक तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ बागल यांनी कार्यक्रमाचे शानदार आयोजन केले होते, होळकर शाहीचे सर्व राजे, जांहगीरदार, सरदार यांचा सर्व वंशदांना एकत्र आणायची किमया करून दाखवली, रंगमहाल लवकर दुरुस्त व्हावे, व लोकांसाठी खुले करावे तसेच चांदवड नगरीत अहिल्यादेवी देखणे स्मारक व्हावे अशी मागणी केली.




