पाचोऱ्यातील प्रसिद्ध डॉ अजय परदेशी, डॉ नेहा ठाकूर यांच्या ओम हॉस्पिटलचे लोकार्पण संपन्न..
- दिलीप जय परदेशी
पाचोऱ्यातील प्रसिद्ध डॉ अजय परदेशी डॉ नेहा ठाकूर यांच्या नवीन जागेत ओम हॉस्पिटलचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते लोकार्पण मोठया उत्साहात पार पडले.
शहरात गेल्या 10 वर्षा पासून पाचोरा शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ अजय परदेशी व स्पिच थेरपीस्ट डॉ नेहा ठाकूर हे दांपत्य देशमुखवाडी परिसरात ओम हॉस्पिटलच्या माध्यमातून गोर गरिबांची गेल्या 10 वर्षा पासून अविरत सेवा करीत असताना त्यांनी अनेक रुग्णांना जीवनदान दिले. डॉ परदेशीचे कोरोना महामारीत काम उल्लेखनीय होते, तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातुन स्पिच थेरपीस्ट म्हणुन डॉ नेहा ठाकूर ह्याची ओळख सांगितली जाते सुरवातीला त्यांनी खूप संघर्ष केला ते आता डॉ अजय परदेशी यांच्या खांद्याला खांदा लावून वैद्यकीय क्षेत्रात आपले काम चोखपणे बाजवतांना दिसतात.
आमदार किशोर आप्पा पाटील हे संबोधित करतांना
ओम हॉस्पिटलचे नाव हे तालुक्यात गरिबांचे रुग्णालय म्हणुन प्रसिद्ध आहे. रुग्णांना आजून चांगल्या सुविधा द्याव्या यासाठी परदेशी दापत्यांनी पाचोरा शहरातील माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या घरा समोर अत्याधुनिक सोयी सुविधा व उपकरणांसह रुग्ण सेवेसाठी सज्ज झालेले व 50 रुग्ण क्षमतेचे ओम हॉस्पिटलचे उभारणी करून रुग्णच्या सेवेत दाखल झाले.

परदेशी कुटुंबियांनी नेहमीच सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्यातच कुंवरशेठ परदेशी यांनी गरीब व हलाकीचे जीवन जगत आपल्या मुलाला चांगले शिक्षण देऊन डॉक्टर बनवले आणि आरोग्य क्षेत्रात जेथे जन्मझाला तेथेच आरोग्य सेवा करण्यासाठी आग्रही होते आणि डॉ परदेशी आणि डॉ नेहा ठाकूर या दापात्यांनीही सेवा करण्याचे ठरविले. शहरातील आरोग्याच्या सुविधेची गरज ओळखून त्यांनी ओम रुग्णालयाची उभारणी केली आहे असे गौरवोद्गार आमदार किशोर पाटील यांनी प्रसंगी काढले.
स्थानिक आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी, काँग्रेसचे सचिन सोमवंशी, माजी नगरसेवक विकास पाटील, पिटीसी संस्थेचे चेअरमन संजय वाघ माजी नगराध्यक्ष छोटू गोहील, राजू काळे व पत्रकार तसेच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.




