आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोऱ्यातून रणशिंग फुंकले, शांतीगिरी महाराज संतांच्या भूमीतून लोकसभेसाठी मैदानात..

वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार..

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा शहरात आज जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी असणारे वेरूळचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची आपल्या शिष्यासमवेत लोकसभा प्रचार बैठक पार पडली शांतीगिरी महाराज संतांच्या भूमीतून म्हणजेच नाशिक लोकसभा मतदान संघात प्रस्थापितांना देणार कडवे आव्हान. पाचोऱ्यात मोठ्या संख्येने भक्तपरिवार उपस्थित होता. नाशिक जिल्ह्यात बाबांचा भक्तपरिवार असल्याने तसेच त्यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील असल्याने त्यांचा नाशिकमध्ये दांडगा संपर्क आहे.


आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे आता सर्वत्र वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणुकीसाठी जोमाने तयारी करत आहेत, त्यातच पाचोरा शहरातील सारोळारोड वरील समर्थ लॉन येथे स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या जय बाबाजी परिवार शिष्यासमवेत लोकसभा 2024 प्रचारक बैठक मोठया उत्साहात पार पडली. यात लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा या विचाराने प्रामाणिकपणे राजकारण करून जनतेचे हिताचे काम करणार असे प्रचारक बैठकितून शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदार संघातुन निवडून स्वतः लढतील व छत्रपती संभाजी नगर, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि जालना या ठिकाणी आपला भक्त शिष्य उभे करणार असा निर्धार करून आपल्या भक्तांना निवडून देण्याचा नारा देऊन प्रस्थापितांना व विविध पक्षानां आव्हान उभे केले आहे.

  • कोण आहेत स्वामी शांतीगिरी महाराज..

शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत. लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार आहे. भजन, प्रवचन, अनुष्ठान, सत्संगच्या माध्यमातून धार्मिक कार्यात पुढाकार ते घेतात. देशभरात त्यांचे 115 आश्रम आहेत, 7 गुरुकुल देखील ते चालवितात. अनुष्ठानच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांची मौनीगिरी महाराज अशीही ओळख आहे. या आधी त्यांनी तब्बल 12 वर्ष मौन पाळले होते. आताही अनुष्ठान काळात ते मौन धारण करतात. छत्रपती संभाजी नगर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि जालना या जिल्ह्यामध्ये मोठा जनसंपर्क आणि जय बाबाजी भक्त असलेले महाराज म्हणजे शांतीगिरी महाराज १९८९ ला जनार्धन स्वामी यांचं निर्वाण झाल्यावर २५ डिसेंबर १९८९ पासून शांतीगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. शांतीगिरी महाराज संन्यास स्वीकारत योगी झाले अन् नाशिक संभाजीनगर जवळ असलेल्या जनार्धन स्वामी मठाचे ते मठाधिपती झाले. २००९ ला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना आव्हान दिलं. अपक्ष लढून एक लाख ४८ हजार मतं मिळवली. पण पराभव होताच राजकारणापासून काहीसे दूर गेले. आता याच शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे