आपल खान्देशआरोग्य व शिक्षणकोकणमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना मिळणार नोकरी, बघा पात्रता..


BMC Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत. भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास भरती सूचना कळजीपूवक वाचा.

वरील भरती अंतर्गत “मानव संसाधन समन्वयक” पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार असेल…

  • मानव संसाधन समन्वयक

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात ४५% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. या भरती साठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे इतकी आहे, तसेच यासाठी अर्ज शुल्क देखील आकारले जाणार आहेत, खुला प्रवर्गासाठी 1000/- रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900/- रुपये इतके शुल्क आहेत.


https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/

इच्छुक उमेदवार अर्ज या लिंकद्वारे सादर करू शकतो, लक्षात घ्या अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी पासून सुरु होईल, दिलेली लिंक तेव्हाच काम करेल. भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.mcgm.gov.in/ ला भेट द्या.

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे 24 फेब्रुवारी पासून करायचे आहेत, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.

अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे