आपल खान्देशमहाराष्ट्र

सुवर्णयुग माझ्या शिवबाचे या विद्यार्थ्यांच्या महानाट्याने रसिकांची मने जिंकली !


शिवजयंती निमित्त पाचोरा शहरातील श्री गो से हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेले “सुवर्णयुग माझ्या शिवबाचे” हे महानाट्य रसिकांच्या मनावर राज्य करणारे ठरले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनय, वेशभूषा आणि ऐतिहासिक प्रसंगांचे चित्रण यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

मंगळवारी सायंकाळी गो से हायस्कूलच्या प्रांगणात पीटीसी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या संकल्पनेतून महेश कोंडीण्य लिखित आणि दिग्दर्शित “सुवर्णयुग माझ्या शिवबाचे” या महानाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या महानाट्याचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी संजयनाना वाघ, नानासाहेब व्ही टी जोशी , दगाजीआण्णा वाघ , खलीलदादा देशमुख, भडगावचे माजी नगराध्यक्ष श्यामकांत भोसले , प्रा भागवत महालपुरे, जिजाबाई पाटील, अभिमन्यू पाटील ‘ शशिकांत चंदिले , मधुकर पाटील, सतीश चौधरी , प्रकाश पाटील , योगेश पाटील , किशोर डोंगरे , विश्वासराव साळुंखे , सुधीर पाटील , वासुदेव महाजन ,नितीन तावडे , प्राचार्य डॉ शिरीष पाटील , डॉ एन एन गायकवाड, डॉ बी एन पाटील , डॉ वासुदेव वले , डॉ जे व्ही पाटील, दत्ता बोरसे,भूषण वाघ ,सुरज वाघ ,गौरव वाघ , आकाश वाघ,सुचेताताई वाघ , ज्योतीताई वाघ मुख्याध्यापिका प्रमिला वाघ , नरेंद्र ठाकरे, आर एल पाटील, अंजली गोहिल आदी उपस्थित होते.या महानाट्यात गो से हायस्कूल मधील इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या 175 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन तास चाललेल्या या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्वाचे प्रसंग सादर करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म, शिक्षण, युद्धनीती, पावनखिंड, तानाजी मालुसरे, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, स्वराज्य स्थापना आणि राज्याभिषेक यासारख्या अनेक प्रसंगांचे उत्कृष्ट चित्रण केले. यात प्रामुख्याने विद्यार्थी कलावंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरची महाराष्ट्रातील स्थिती, आदिलशाही कुतुबशाही व मुस्लिम राज्यकर्त्यांची आंदोलने , ब्रिटिशांची गुलामगिरी , शहाजीराजांची सरदारकी , महाराष्ट्रातील जनतेवर वाढणारे अन्याय अत्याचार , शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांना जिजाऊ व सरदारां कडून मिळालेले शिक्षण , युद्धनीती , पावनखिंडीचा बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम , तानाजी मालुसरे यांनी घेतलेला कोंडाणा किल्ला , बडी बेगम साहेबांच्या दरबारात अफजलखानाने शिवाजी राजांना ठारर करण्याचा उचललेला विडा ,शाहिस्तेखाना वरील हल्ला , शिवरायांनी जिंकलेले किल्ले , प्रतापगडावरील अफजलखानाचा वध यासह महिला , तरूण, शेती व शेतकरी यांच्या संरक्षणार्थ शिवरायांनी राबवलेली ध्येयधोरणे , हिंदवी स्वराज्याची स्थापना व शिवरायांचा अत्यंत नयनरम्य असा राज्याभिषेक सोहळा असे अनेक प्रसंग कसदार अभिनयातून विद्यार्थ्यांनी साकारले.उत्कृष्ट वेशभूषा, दिव्यांची रंगसंगती, फटाक्यांची आतषबाजी, भगवे झेंडे आणि फेटे, प्रसंगानुरूप ध्वनी आणि पोवाड्याच्या माध्यमातून सादर केलेले हे महानाट्य गो से हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी व सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केल्याबद्दल  

  • प्रेक्षकांना विशेष आवडले त्यांनी सर्वांचे कौतुक केले.

सोबतच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोष करून विद्यार्थी कलाकारांचा उत्साह वाढवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब संजय वाघ यांनी केले तर अजय अहिरे आणि आर.बी. बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. महेश कौडीण्य यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे