आपल खान्देशआरोग्य व शिक्षणब्रेकिंगसखी

पाचोरा तालुक्यात अंगणवाडीताई आपल्या हक्काच्या वेतनापासून वंचित!

पाचोरा तालुक्यातील अंगणवाडी मदतीसांचा म्हणजेच अंगणवाडीताईचा गेल्या सहा महिन्यापासून त्या  वेतन  पासून वंचित आहेत,  वेतन नसल्याने त्यांचा संसारचा गाडा थांबला मात्र ते नियमित इकडे अंगणवाडी मदतीसांचा काम सुरु असून त्यांच्याकडे प्रशासन लक्ष देईना, मात्र सामजिक कार्यकर्त्ता निलेश उभाळे यांची प्रशासनानेत तक्रार दाखल करूनही कोणी लक्ष देईना. प्रशासन एक प्रकारची थट्टा तर करत नाहीनां?

पाचोरा तालुक्यात अंगणवाडी मदतनींसाचा पगार नियुक्ती पासून अद्यापही झाला नसल्याने या ताईंवर मोठा अन्याय होत असल्याने पाचोरा तालुक्यातील समाजसेवक निलेश उभाळे हे ताईंच्या मदतीला धावले असून याबाबत त्यांनी तक्रार वरिष्ठ स्तरावर दाखल केल्याची माहिती आज दिनांक 21 फेब्रुवारी बुधवार रोजी हाती आले आहे, सदर तक्रार संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून याबाबतची माहितीस्तव प्रती मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, मा.राष्ट्राध्यक्ष भारत राष्ट्र, मा.प्रधानमंत्री भारत राष्ट्र, मा.राज्यपाल (महाराष्ट्र राज्य), मा.मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य मंत्रालय-४०००३२), यांकडे देखील पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती निलेश उभाळे यांकडून मिळाली आहे, तसेच पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मतदारसंघात महिलांवर होत असलेला अन्याय हा अमान्य असून आमदार आप्पासाहेब देखील तात्काळ लक्ष देतील असे देखील निलेश उभाळे यांनी सांगितले,

तर तक्रारीत म्हंटले आहे की, माननीय महोदय साहेब जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवाप्रकल्प अंगणवाडी या विभागात पाचोरा तालुक्यातील अंगणवाडी मध्ये मदतनीस म्हणून सुमारे 50 ते 55 महिलांना अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती देण्यात आली होती, सदर महिला या कामावर रुजू देखील झाल्या आहेत व नित्यनियमाने रोज कामावर हजर देखील होत आहेत, त्या दिवसापासून आज पावतो काम सुरू आहे, सदर नियुक्ती ही 1 सप्टेंबर 2023 रोजी पासून देण्यात आली होती, तरी त्या दिवसापासून ते आज पावतो तालुक्यातील एकाही महिलेस अद्याप पर्यंत एकाही दिवसाचा वा महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही, व इतर कोणतेही देय भत्ते देखील देण्यात आले नसल्याची माहिती तक्रारदार महिलांच्या तोंडून समोर आली असल्याने पगार देयके एकाही महिलेस का देण्यात आला नाही व सदर पगारी देण्यात विलंब का होतोय याबाबत सखोल चौकशी होऊन सविस्तर अधिकृत माहिती मिळावी तसेच यात जर कुणी अधिकारी व कर्मचारी या पगारीत देण्यात टाळाटाळ करत असेल तर त्यांवर कठोर कारवाई होऊन केलेल्या कारवाई बाबतची माहिती प्राप्त व्हावी तसेच पाचोरा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंगणवाडी कार्यालय येथील CDPO म्हणून जे कारभार पाहताय ते प्रभारी पदी असल्याने या तालुक्यातील अंगणवाडी बाबतची सर्वच कामे रखडली गेलेली आहेत कोणतीही महत्त्वाचे ऑनलाईन व ऑफलाईन काम हे पूर्ण झालेले नाही त्यामुळे येथील बालके ही शिक्षणापासून व इतर मिळणाऱ्या सर्वच वस्तू व घटकांपासून वंचित झालेले आहेत, यात कारणीभूत असलेले अधिकारी व येथील कर्मचाऱ्यांवर देखील कठोर कारवाई व्हावी व केलेल्या कारवाईचा अहवाल प्राप्त व्हावा, तसेच येथील CDPO प्रभारी अधिकारी जिजाबाई राठोड व येथील क्लार्क दिनेश पाटील हे आपल्या कामात कुचराई करत असल्याबाबत निदर्शनास येत असून त्यामुळे सर्व पगारे कामे खोडंबली असल्याबाबतची चर्चा तालुक्यात सुरू असल्याने सर्वच महिला आपल्या हक्काच्या पगारापासून वंचित झाल्याची माहिती मिळत आहे, या महिला लवकरच आंदोलनाच्या पवित्रात असल्याबाबतची माहिती देखील समोर येत असून, लवकरात लवकर या दोषींवर कठोर कारवाई होऊन सर्वच महिलांना पगारी वेळेवर मिळून इतर देय भत्ते देखील मिळावेत ही विनंती. तसेच पाचोरा शहरातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील कार्यालयावर कुणाचेच लक्ष नसल्याने येथील अधिकारी व कर्मचारी हे कामचुकार झाले असून येथे थम मशीन कार्यरत करावी यांची दैनंदिन हजेरी घ्यावी असे कळविले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे