आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग
लोहाऱ्यातुन चोरट्यांनी तीन म्हशी चोरून नेल्या, अद्याप चोरांचा तपास नसल्याने शेतकरी हवालदिल
लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी सुरेश लक्ष्मण गुजर व दिलीप लक्ष्मण गुजर या दोघ भावंडांचे खळे गावाच्या शेजारी असणाऱ्या सोननदी काठी आहे.दि.19च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या तीन म्हशी, अंदाजे किंमत 3 लाख रुपयांच्या चारचाकी वाहनातून नेल्याची खात्री आहे.
या बाबत शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरे येथे अर्ज दिल्याचे कळते.मात्र अद्याप गुन्हा नोंद झाला नाही. मागील तीन वर्षांपूर्वी सुद्धा याच शेतकऱ्यांचे गुरे चोरीला गेल्याचे कळते,तरी पोलिसांनी त्वरित या चोरट्यांचा बंदोबस्त करावा.अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.



