कृषीवार्ता

यास वादळाचा पावसासह खान्देश विभागात जोरदार तडाखा!! केळीच्या बागांचे नुकसान

दिलीप परदेशी.

29/05/2021// रविवार

आज सकाळी यास वादळाचा पावसासह खान्देश विभागात जोरदार तडखा!!

जळगाव जिल्ह्यात सर्वत्र यास वादळाचा फटका बसला पाचोरा व भडगाव, चाळीसगाव तालुक्यात केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने केळीच्या बागांची पाने फाटून गेली आहे. अनेक ठिकाणी काढणीस आलेल्या बागा आडव्या झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या यास वादळा मुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

एकीकडे केळीचे क्षेत्र वाढत असताना मात्र गतवर्षी पासून कोरोना आणि कडक निर्बंधांमुळे केळीच्या मार्केटला याचा मोठा फटका बसला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. यावर्षी तरी दिलासा मिळेल ही आशा बाळगून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात केळीची लागवड केली होती. केळी काढणीस येणे आणि निर्बंध लागणे यामुळे अगोदरच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे