आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

पाचोरा तालुक्यातील होऊ द्या चर्चा कार्यक्रमातून केंद्र व राज्य सरकारच्या खोट्या आश्वासनांचा भांडाफोड


पाचोरा (झूम वृत्त) शिवसेना पक्षप्रमुख तथा मा. लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील शिंदाड व सातगाव डोंगरी येथे शिवसेना नेत्या सौ, वैशालीताई सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख श्री उद्धव मराठे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, युवासेना जिल्हा उपप्रमुख संदीप जैन, व युवा सेना तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होऊ द्या चर्चा कार्यक्रमावेळी ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी या म्हणाल्या की, सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जी आश्वासने नवनिर्माण भारताचे स्वप्न उभे केले होते ते आज दहा वर्षाच्या काळात जनतेचा भ्रम निराश झाला.

मतदार राजांची घोर फसवणूक झाली, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले, कर्ज वसुली सक्तीची आहे म्हणून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, उत्पन्नाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांचे पांढरे सोने कापूस पिकाला भाव नाही, खरेदी केंद्र बंद पडलेले, आजही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पळून आहे, आरोग्याच्या सुविधा कोळमळल्या, इमारती उभ्या केल्यात, डॉक्टर्स, नर्स इतर स्टाफ भरती नाही, साथीच्या लसीकरणाचे औषधे उपलब्ध नाहीत, सर्पदंश, श्वान दंश यावरील औषधे सरकारी रुग्णालयात नाही सरकारी दवाखान्यांचे फक्त इमारतीचे टोलेजंग जंगले उभे केले, काळे धन भारतात आले नाही, पंधरा लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा केले गेले नाही, रोजगार उपलब्ध केला नाही, प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली, सुशिक्षित तरुणांच्या जीवनात नैैराश्य निर्माण झाले, महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला पोहोचले, गरिबांची चूल कशी पेटवावी हा प्रश्न उभा राहिला आहे.

नवीन धोरणे नव्या योजना फसव्या असून अंबलबजावणी शून्य आहे, महिला अत्याचार, बलात्कार, विनयभंग प्रमाण वाढले असून गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही नाही हे श्रीरामाचे नाव घेऊन राज्य करण्याचं दुर्दैव आहे भाजपा सरकारचं. महाराष्ट्रात महा आघाडीचे शासन होते मा. श्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ने घेतलेले निर्णय तमाम जनतेच्या हिताचे होते. महाराष्ट्रातील बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी कर्जमुक्त करण्यासाठी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी बिना अटी शर्तीची सरसकट कर्जमाफी देऊन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. कापूस व इतर पिकांना हमीभाव दिले. कोरोना हे जागतिक महामारी असताना कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावून लाखो नागरिकांचे प्राण वाचवले. औषधोपचार ऑक्सिजन पुरवून उपलब्ध करून सुनियोजित बंदाचे नियोजन करून कोरोना महामारी सोबत यशस्वी लढा दिला व जगातील आदर्श मुख्यमंत्री ठरले तरी देखील भाजपाने कटकारस्थान करून सत्तांतर घडवले. हे महापाप केले येणाऱ्या 2024 मध्ये या पापाचा बदला घ्यावा लागेल भाजपापासून देशाला वाचवावे लागेल भाजपा मुक्त देश उभा करण्याची प्रतिज्ञा घेऊया असं ताईसो यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री उद्धव मराठे यांनी केले, सूत्र संचालन राजेंद्र राणा यांनी केले. यावेळी नरेंद्र सिंग सुर्यवंशी, पप्पू राजपूत, दादाभाऊ चौधरी, भरत खंडेलवाल, हिलाल पाटील, अरुण तांबे, प्रितेश जैन, ज्ञानेश्वर चौधरी, प्रेमचंद पाटील, पुंडलिक जिभाऊ, आनंदा चौधरी, रविंद्र पाटील, रवींद्र विक्रम पाटील, प्रदीप बोरसे, गोपाल सपकाळ, सुधाकर पाटील, लक्ष्मण तुकाराम, पाटील दिगंबरमाळी, सतीश माळी, संजय पाटील, सुनील परदेशी, वसंत गवळी, गणेश पाटील, सतीश माळी, रवींद्र पाटील, भाईदास धुमाळ श्री. योगेश एकनाथ पाटील,अमर रघुनाथ पाटील, संजु विश्वनाथ भरोडे, समाधान गोविंदा भोई, भारत रमेश पाटील, चंद्रभान गोविंदा भोई, सुनील रामा गायकवाड, मनोज दगडू सूर्यवंशी, दिलीप अर्जुन पाटील, किरण दिगांबर पाटील (गाव्हडे) वाडी, आनंदा चौधरी, अशोक सपकाळ, प्रदीप बोरसे,संजु पाटील प्रिंपरी, गणेश पाटील शेवाळे, प्रेमचंद पाटील, बालू दादा, डॉ. पाटील, उमर बेग, अरमान दादा,राबेखा पठाण,सुधाकर पाटील, लक्षुमन पाटील, डॉ. राजेंद्र परदेशीं सह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे