आपल खान्देश

पाचोरा तालुक्यातील आखतवाड्यात स्वच्छता अभियान मोहीम उत्साहात


पाचोरा (झूम वृत्त) राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आखतवाडे ग्रामपंचायत सरपंच / उपसरपंच सदस्य ग्रामसेवक व तरुण युवक व पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष / उप अध्यक्ष रोजगार सेवक ग्रा पं शिपाई कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालय जवळ सर्वांनी एकत्र जमून प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर श्री सुनील गवळी सर यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले व श्री गवळी सरांनी डेंगू ह्या आजारावर कश्या प्रमाणे उपाययोजना व प्रतिबंध आणता येईल या बाबत मार्गदर्शन केले तद्नंतर जिल्हापरिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री रितेश वाणी सर यांनी सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांना बालविवाह न व बालविवाहास प्रतिबंध करण्या संबंधि शपथ दिली ह्या वेळी अतिशय मोठ्या प्रमाणात तरुण युवक शिक्षक विद्यार्थी व महिलांनि ग्रामस्थांनी गावातील कचरा साफ करून एका ट्रॅक्टर मध्ये जमा केले व सहकार्य करून चांगल्या पद्धतीने स्वच्छता अभियान मोहीम यशस्वी केल्या बद्दल उपसरपंच श्री दिपक गढरी यांनी सर्वांचे आभार मानले.

  • यांची उपस्थिती लाभली 
  • स्वामी विवेकानंद अभ्यासिका
  • फैजाने रजा फौंडेशन ग्रुप आखतवाडे
  • आखतवाडे उपकेंद्रातील सर्व कर्मचारी
  • जिल्हापरिषद मराठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मित्र
  • जिल्हापरिषद उर्दू शाळेतील शिक्षक व विद्यार्थी
  •   महाराणा प्रताप मित्र मंडळ
  • शिवशक्ती मित्र मंडळ
  • शिवगर्जना मित्र मंडळ
  • शौर्य गणेश मित्र मंडळ
  • अंगणवाडी सेविका व मदतनीस
  • विठाई गृह उद्योग महिला बचत गट
  • महावितरण कर्मचारी आखतवाडे (कक्ष नेरी)
  • संघर्ष मित्र मंडळ
  • पशु चिकित्सा कर्मचारी आखतवाडे
  • महात्मा गांधी तंटामुक्त समिती व पोलीस पाटील आखतवाडे
  • भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांचे समर्थक आखतवाडे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे