आपल खान्देशमहाराष्ट्र

पाचोऱ्यात गणेश शिंदे यांनी पालक व विध्यार्थी प्रबोधनात्मक व्याख्याना द्वारे दिला संदेश..

पाचोरा (झूम मराठी) – विज्ञान युगाच्या स्पर्धेत शिक्षण, उद्योग, व्यवसायात टिकून राहण्यासाठी आणि विविध विविध क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी आणि सोशल मीडियाच्या अति आहारी जाणाऱ्या युवापिढीला मार्गदर्शन व प्रबोधन करण्यासाठी न्यु इंग्लिश स्कुलच्या अध्यक्ष, निर्मल सिडसच्या संचालिका तथा ठाकरे गटाच्या सेनेच्या नेत्या वैशालिताईंनी सुर्यवंशी यांनी पाचोरा येथे दि.26 ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी तीन वाजता शहराच्या महालपुरे मंगल कार्यालयात सुप्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रजवलन आणि गोंडगाव, एरंडोल येथील अत्याचारात बळी पडलेल्या चिमुकल्या मुलींना श्रद्धांजली देऊन करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर श्रीमती कमलताई पाटील, सौ.वैशालिताई सूर्यवंशी, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, नरेंद्र सुर्यवंशी, डॉ. योगेंद्रसिंग मौर्य, माजी जि. प. सदस्य राजेंद्र पाटील, उद्धव मराठे, सौ. तिलोत्तमा मौर्य, माजी / नगरसेविका सौ. योजनताई पाटील, दादाभाऊ चौधरी, युवासेनेचे पप्पू राजपूत, अनिल सावंत, पप्पू जाधव, सौ. पारोचे निर्मल स्कुलचे शिक्षक, शिक्षिका सह शहरातील मान्यवर, प्रतिष्ठित आदींची उपस्थिती होती.

सद्यस्थितीत दररोज चिमुकल्यांवर अत्याचार, युवक- युवतींच्या आत्महत्या हा समाजात चिंतेचा विषय झाला आहे. बलात्कार, अत्याचार, हिंसाचारच्या घटना पाहून ऐकून मन सुन्न होते. नैराश्यातुन आत्महत्या करणे हा पर्याय नाही. मुला-मुलींनी आपल्या आई- वडिलांच्या दिलेले संस्कार जपले पाहिजे. आजची युवा पिढी मोबाईलच्या नादात मैदानी खेळ विसरत आहे. मोबाईलच्या अतिवापर मुळे कुटुंबातील संवाद हरपला आहे. युवा पिढीने आपली शक्ती योग्य ठिकाणी वापरली पाहिजे. आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक प्रगतीत माणसाचा ताण-तणाव वाढला आहे. मानसिकता खचण्याची करणे युवापिढीसाठी घातक आहे. आजची युवा पिढी देशाचे भवितव्य आणि संपत्ति आहे. यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य असून या उगवत्या पिढीला दिशा देऊन मन शुद्ध केले पाहिजे या हेतूने प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला असल्याचे प्रस्ताविक भाषणात वैशालिताई सुर्यवंशी म्हणाल्या.

कोणाचेही अनुकरण न करता आपल्या परिस्थिती नजरे समोर ठेवावी. आई – वडिलांनी दिलेले संस्काराची जाणीव ठेवत आपले भवितव्य घडविण्यासाठी व स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वतः ला वेगळे सिध्द केले पाहिजे. सोशल युगात बदलत चालला असून सवयींचा गुलाम बनला आहे. सोशल मीडियाच्या वापरावर मर्यादा असावी. मोबाईल,सोशल मीडियाच्या अति वापरामुळे माता- पित्यांचा आपल्या लेकरांशी संवाद कमी होत आहे. तर मुलं-मुलींनी देखील आपल्या नावाने आपला बाप ओळखला गेला पाहिजे असे नाव कमवून दाखविले पाहिजे. आई – बापाची मान शरमेने खाली जाणार नाही असे मुला-मुलींनी वागले पाहिजे. मोठी स्वप्न बघायला शिका, फक्त नोकऱ्यांच्या मागे न पळता अनेकांना रोजगार देणारे यशस्वी उद्योजक बना. काळ आणि वेळे नुसार बदलले नाही तर स्पर्धेत टिकू शकणार नाहीत. मार्केटिंग मध्ये नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केली पाहिजे. चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार करायला शिका आणि स्वतःला सिद्ध करा आपणच आपल्या भवितव्याचे शिल्पकार आहात असे उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रबोधन आणि व्यावसायिक मार्गदर्शन व्याख्याते श्री. शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नाना वाघ यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे