आपल खान्देशसखी

गिरड गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्काराने कमलबाई पाटील व सुशिलाबाई कोळी सन्मानित

गिरड (कैलास सोनवणे) राजमाता पुण्यश्लोक आहिलयाबाई होळकर यांची 298 पुण्यतिथीनिमित्ताने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या कमलबाई भिमराव पाटील व सुशिलाबाई श्रावण कोळी या कर्तबगार महिलांना गिरड ग्रामपंचायत मार्फत  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

शासन निर्णयानुसार गावातील दोन कर्तबगार महिलांची निवड ग्रामपंचायत स्तरावर करायची होती. त्यामध्ये ग्रामस्तरावर तसेच पंचकोषातील गावांमध्ये श्रीमती कमलबाई भिमराव पाटील व श्रीमती सुशिलाबाई श्रावण कोळी यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांना सन्मानचिन्ह, पुरस्कार, रोख पाचशे रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामसेवक सरपंच. उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अंगनवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचाऱी व गिरड गावांतील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे