आपल खान्देशमहाराष्ट्र

रावेर तालुक्यातील रायपुर येथील सरपंच, उपसरपंचासह तीन सदस्य अपात्र, अतिक्रमण केल्याचे प्रकरण भोवले..

झूम मराठी वृत्त

रावेर (झूम मराठी) रावेर तालुक्यातील रायपुर ग्रामपंचायतीचे सरपंच रूपेश पाटील, उपसरपंच तुकाराम तायडे, सदस्या सौ रेखाबाई तायडे. सौ माधुरी चौधरी श्री प्रकाश तायडे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्या प्रकरणी सरपंच, उपसरपंच व तीन सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे म्हणून मनोहर पाटील यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर चौकशी होऊन सरपंच,उपसरपंच व तीन सदस्य.यांनी शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे, जळगाव जिल्हाधकारी अभिजित राऊत यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्य पदावरुन दिनांक 19/7/2022. रोजी अपात्र घोषित करण्यात आले.

या बाबत सर्विस्तर वॄत असे कि सरपंच रूपेश युवराज पाटील, उपसरपंच तुकाराम तायडे , सदस्या सौ रेखाबाई तायडे, सौ माधुरी चौधरी,सदस्य प्रकाश भिकारी तायडे-यांनी शासकीय जमिनीवर विना परवानगी अनधिकृत पणे अतिक्रमण करून त्यावर पत्री घरांचे बाधकाम केलेले आहे व अतिक्रमित जागेचा लाभ एकत्र कुटुंबा सह घेत असल्यामुळे त्यांना सरपंच, उपसरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून मनोहर लक्षुम्न पाटील .यांनी ग्रा. प. अधिनियम 1958 चे कलम 14-1जे- 3 व 16 प्रमाणे, जिल्हाधिकारी यांचे कडे विवाद अर्ज क्र-6/022. ने तक्रार दाखल केली असता, त्यावर सखोल चौकशी होऊन सरपंच ,उपसरपंच व इतर तीन ग्रा प. सदस्य यांनी शासकीय गांवठाण जमिनीवर शासनाची कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशिर व अनधिकृत पणे भोगवटा सदरी ग्रा .प. दप्तरि नावे लावुन घेतले आहेत. व सदर शासकीय जागा मिळकती ताब्यात ठेवून लाभ घेत आहेत. व पदाचा दुरूपयोग केला असल्याचे सिद्ध झाल्यामुळे सरपंच, उपसरपंच व तीन ग्रा. प .सदस्य यांना सदस्य पदावरुन जिल्हाधिकारी श्री डॉ राऊत. यांनी अपात्र ठरविले आहे. आम्ही स्वत: हुन अतिक्रमण केलेले नाही, गावठान ची जागा ही शासकीय जागा असुन त्यावरील भोगवठा हे अतिक्रमण समजले जाऊ शकत नाही, कारण शेतकरी अथवा ग्रामस्थाना तात्पुरते वापरासाठी व ग्रा. प. चा महसुल वाढि साठी त्या जागा देऊन कर आकारणी ग्रा.प .करीत असते .त्यामुळे ते अतिक्रमण सिद्ध होत नाही. हा सामनेवाले यांचा बचाव देखील फेटाळण्यात आला आहे. या निकाला मुळे ग्रामस्थांन म्हधे समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.व अतिक्रमण धारकांना मोठी चपराक बसली आहे. तक्ररदार श्री मनोहर पाटील यांचे वतीने अँड.विश्वासराव भोसले.(पिपरखेडकर) यांनी काम पाहिले. या निकाला कडे परीसराचे व तालुक्याचे लक्ष्य लागुण होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे