आपल खान्देश

परवान्याशिवाय विकता येणार नाही कोणतेही खाद्य पदार्थ

खाद्य क्रमांक आल्या शिवाय विक्रेत्याला आता कोणतीही खाद्यवस्तू विकता येणार नाहीये. यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.

जळगाव-  एक ऑक्टोबरपासून अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाच्या परवाना घेणे आता सक्तीचे झाले आहे. या द्वारे मिळणाऱ्या क्रमांक आल्या शिवाय खाद्य विक्रेत्याला खाद्यपदार्थ विकणे अशक्य होणार आहे. खाद्य क्रमांक आल्या शिवाय विक्रेत्याला आता कोणतीही खाद्यवस्तू विकता येणार नाहीये. यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.

अन्नसुरक्षा आणि मानद प्राधिकरणाने सर्व राज्यांच्या आरोग्य सुरक्षा आणि नियमन विभागाच्या नवीन सूचना जारी केल्या आहेत. खाद्य व विक्रेत्यांना परवाना घेणे सक्तीचे आहे तसेच त्यासाठी दर दोन वर्षांनी एक दिवसाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे.

हॉटेल, ढाबा, किराणा, दुकान, मीठाई, दूध व इतर सर्व खाद्यपदार्थ व्यवसायिकांना सक्तीचे आहे. यासाठी अन्नपदार्थ विक्रेत्याला केंद्र सरकारची मान्यता असलेला परवाना दिला जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे