आपल खान्देश

एरोंडोल मधील बोगस खरेदीखत! “तेलगी” कोण?

20 वर्षांपूर्वी राज्यात तेलगीने जसे कारनामे केले होते तेच कारनामे एरोडोलमध्ये होत आहेत, काही वर्षापूर्वी या तथाकथित राजकीय वलय असणाऱ्या स्टॅम्प वेंडरकडून एक बोगस खरेदी खत करण्यात आले. हा मुद्दा राजकीय देखील बनला. उघडपणे त्यावर काही राजकीय नेत्यांनी आरोपही केले. वृत्तपत्रात रकानेच्या रकाने देखील छापून आले. तरी देखील अधिकाऱ्यांनी साधी चौकशी करून सत्यता तपासण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे या महाशयांची हिम्मत बळावत गेली. त्याचप्रमाणे विधवा महिलांना दिल्या जाणाऱ्या लाभाच्या योजनेतही नवरा हयात असतांना त्यांना विधवा लाभाच्या योजनेचा फायदा या तथाकथित स्टॅम्प व्हेंडर सह इतरही स्टॅम्प वेंडर यांनी मिळवून देऊन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यात काही स्टॅम्प वेंडर वर कारवाई देखील झाली. काहींचे लायसन्स देखील रद्द करण्यात आले होते. मात्र या तथाकथित बनावट दस्तऐवज तयार करण्यात माहीर असलेल्या व राजकीय वलय असलेल्या स्टॅम्प वेंडर वर कुठलीही कारवाई झाली नाही की लायसन्स रद्द झाले नाही. मध्यंतरी अजून एका दस्तऐवजात महिला जिवंत असताना तिला मृत दाखवून बनावट दस्तऐवज करण्यात आल्याची घटनाही उजेडात आली होती. त्याचप्रमाणे खडकेसिम येथील देखील एका बनावट दस्तऐवज प्रकरणात याच महाशयांची कलाकारी उघडकीस आली होती. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

नुकतेच सद्यस्थितीत चक्क एका प्राध्यापकाची 37 लाखात फसवणूक झाल्याची घटना उजेडात आली आहे. ज्यात प्राध्यापकाच्या तक्रारी वरून गून्हा दाखल झाला आहे. सदतीस लाखांत फसवणूक करण्यात आली त्यातही दस्तऐवज तयार करणारे स्टॅम्प व्हेंडर महाशयांचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे दुसरी बोगसगिरी अशी की, या गुन्ह्यात आरोपी म्हणून ज्याचे स्टॅम्प वेंडर म्हणून नाव दर्शवण्यात आले आहे. तो मुळात स्टॅम्प वेंडर नसून मूळ बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या सराईत स्टॅम्प व्हेंडर चे नाव राजकीय दबावापोटी वगळून त्याच्या कारकुनाला स्टॅम्प वेंडर म्हणून दाखविण्यात आल्याचेही कळते. म्हणजे प्रशासनाच्या नजरेत धूळफेक करण्यात सदरचा स्टॅम्प वेंडर किती माहीर आहे व त्याचा राजकीय दबाव अधिकाऱ्यांवर किती प्रमाणात वाढला आहे यावरून दिसून येते.

विशेष म्हणजे प्रशासनाला माहीत असतानाही या गोष्टींची खातरजमा न करता गुन्हा दाखल होतोच कसा? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

तसेच हे महाशय जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या पदावर असताना त्याने जवळपास तब्बल तीन कोटींची कामे न करताच बनावट बिले सादर करून निधी लाटून शासनाची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार एका विश्वसनीय व्यक्तीकडून कळाला. हे सगळे पुराव्यानिशी कागदपत्र गोळा करण्याचे काम सुरू असून लवकरच त्याचाही भांडाफोड होणार असल्याचे सदर व्यक्तीने सांगितले.


स्टॅम्प पेपर घोटाळ याआधी झाला होता

अब्दुल करीम तेलगी याला कोट्यवधी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळा प्रकरणी 2007 मध्ये दोषी ठरविण्यात आले होते. त्याला 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती तसेच 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. 2007 मध्ये उघडकीस आलेल्या मुद्रांक घोटाळ्याने आणि तेलगीने आपल्या कबुलीजबाबात महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांची नावे घेतल्याने तेव्हा हा गैरव्यवहार माध्यमांत चांगलाच गाजला होता. या प्रकरणी सात जून 2003 रोजी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात भिवंडीतून 2200 कोटी, तर मुंबईतील कफ परेड भागातून 800 कोटी रुपयांचे बनावट मुद्रांक जप्त करण्यात आले होते. बनावट मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती एवढी होती, की त्यानंतर तेलगीवर देशभरात 39 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे