आपल खान्देश

अनियमिततेने काम करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा – प्रहारचे योगेश पवार यांनी केली मागणी

अंमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर दहिवद येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्री.संजीव साहेबराव सैदाणे यांनी ग्रामपंचायत मधील शासकीय सेवेत असलेल्या २ व्यक्तींना दिव्यांग ५% निधीतून मालमत्ता करात १०,५५०/- रुपये तर दुसऱ्या व्यक्तीस १४१८/- रुपये सूट दिल्यावरून प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी असा गंभीर प्रकार शासनाच्या निदर्शनास आणून दिला असून या बाबत अमळनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.हिरालाल वाघ यांनी अर्जानुसार ग्रा.पं जाऊन चौकशी केली असता तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी लाभ दिल्याचे सिद्ध झाले असल्याने गटविकास अधिकारी श्री.एकनाथ चौधरी यांनी अनियमितता केल्याने प्रशासकीय कारवाईस पात्र असल्याचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव यांना सादर केला असून यातील काही अधिकारी तक्रार धारकांनबरोबर चिलम तंबाखू (ईस घर कु उस घर कु) असा खेळ खेळत असून मा.ना.बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेने राज्य उपाध्यक्ष अभय पवार सह खजिनदार अडवोकेट कविताताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी वेळोवेळी अश्या अनियमिततेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कायद्याने प्रहार केला आहे. तरी या ग्रामविकास अधिकारी कडून भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नसून मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन जि. प कडून निश्चितच आम्ही कारवाई करू असे आश्वासन डॉ.पंकज आशिया यांनी दिले अश्या अधिकारीचे त्वरित निलंबन करावे अशी मागणी योगेश पवार, जितेंद्र पाटील यांनी केली असून दिव्यांगांकडून जिल्ह्यातून या विषयाला जोर धरत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे