आपल खान्देश

अतिक्रमणावर पाचोरा पालिकेची धडक कारवाई!


 पाचोरा (प्रतिनिधी) सोमवार दि.14 आज पाचोरा शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. पाचोरा नगरपालिका प्रशासनाने रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. परंतु पालिका प्रशासनाकडून एकदा अतिक्रमणांवर कारवाई झाल्यानंतर पुन्हा कित्येक महिने कारवाई होत नसल्याने पुन्हा अतिक्रमणे उभी राहत आहेत. त्यामुळे या कारवाईत सातत्य राहिले नाही तर तो केवळ दिखावाच ठरेल, असे मत शहरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत.

पालिकेत सध्या सर्वोसर्वी प्रशासक & मुख्याधिकारी यांना अधिकार असल्याने कोणत्याही राजकीय मान्यवरांचा हस्तक्षेप तर नव्हता किंबहुना आलेल्या अतिक्रमण धारकांसमोर कॉल देखील केला असेल तो समाधानासाठी घेऊन त्यास कितपत ऐकता न ऐकता बाहेरपूरा भागातील मच्छीबाजार परिसरा पासुन प्रचंड फौजफाटयासह जेसीबी द्वारे अतिक्रमणे काढण्यास सुरवात झालेली असती तरी टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्वच भागातील अतिक्रमणे हटवणार असल्याचे मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांनी  प्रसार मध्यमाशी बोलतांना सांगितले.

पाचोरा येथे शहरातील प्रमुख रस्ते व चौकात गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण वाढतच होते प्रामुख्याने कायम स्वरुपी अतिक्रमणापेक्षा हातगाडी विक्रेते यांच्यामुळे प्रामुख्याने वाहतुकीची कोंडी, वादविवाद, अपघात, हानी असे प्रकार वाढून शहराचे सौंदर्य धोक्यात आल्या बाबत अनेकांनी पालिका प्रशासनाकडे अतिक्रमण काढण्यासंदर्भात मागणी व तक्रारी केल्या होत्या. गेल्या आठवड्यात पालिकेने अतिक्रमण हटविण्या संदर्भात भूमिका घेतली होती व तशा नोटिसा देखील दिल्या होत्या पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळताच आज दि14 सोमवार पासून या मोहिमेला जोमाने प्रारंभ करण्यात आला.विशेषबाब म्हणजे अनेकांनी लिलावात गाळे घेतले आहेत परंतु काहींची पुर्णतः डिपॉडीट जमा नाही अनेकांची भाडे व घरपट्टी थकीत आहे ती गंभीर पाऊले उचलुन वसुली करणे हे एकमात्र कडवट व प्रभावी अभियान राबविण्यात येणार असल्याचे समजले विशेषबाब म्हणजे आजही भाजी मार्केटच्या ओट्यांचे लिलाव झाल्या नंतर भाज्याची दुकाने जैथे थे आहे न पा मालकीच्या जागेवर काही महाभाग चक्क दिवसाला हजार ते पंधराशे रुपये दिवसाला भाडे कमवत आहे. गाड्याना स्वतंत्र हॉकर्स झोन दिलेला असला तरी ते देखील मनाला पटेल तेथे उभे राहतात हे देखील न.पा. प्रशासनाच्या लक्षात आल्याने न पा मुख्याधिकारी शोभाताई बावीस्कर यांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन काढणार असल्याचे सांगीतले यामुळे

बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल परिसरातील भाजीपाला, फळ विक्रेत्यांना आपली अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी स्वतंत्र बैठक घेऊन सूचित केले. त्याआधारे त्यांनी आपापली अतिक्रमणे काढून घेतल्याने पालिका जीनचा परिसर काही प्रमाणात मोकळा झालेला आहे. बाहेरपूरा भागातील मच्छी बाजारापासून कच्ची व पक्की अतिक्रमणे काढण्याला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. यासाठी दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर, पालिकेचे सुमारे 50 कर्मचारी , पोलीस मुख्यालय जळगाव, पाचोरा ,पहूर व पिंपळगाव हरेश्वर येथील पोलिसांचा फौजफाटा तैनात करून अतिक्रमणे काढण्यात आली. काहींनी नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली तर आठवडे बाजारातील काही अतिक्रमण धारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. त्यानंतर त्या अतिक्रमणा संदर्भात पालिका प्रशासन निर्णय घेणार आहे. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, अध्यक्ष कर अधिक्षक मराठे यांनी स्वतः उपस्थिती देऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. दरम्यान या अतिक्रमण हटाव मोहिमेचे नागरिकांकडून कौतुक होत असून अतिक्रमणे काढली पण ती पुन्हा जैसे थे होऊ नयेत यासाठी पालिकेने सजग राहावे अशीही मागणी व अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे