महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सी4आय4’ लॅबचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन


 पुणे,(विशेष प्रतिनिधी उदय नरे.): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ (सी4आय4 लॅब) येथील ‘एसएमई प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड अनँलिटीक्स लॅब’चे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले.

  यावेळी, किर्लोस्कर उद्योग समूहाचे उद्योगपती राहुल किर्लोस्कर, कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, लॅबचे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर आदी उपस्थित होते.

  केंद्र शासनाच्या ‘समर्थ’ उद्योग कार्यक्रमांतर्गत इंडस्ट्री.4 ला गती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 5 केंद्रामध्ये ‘सी4आय4’  लॅबचा समावेश आहे. ही लॅब  उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अनुभव केंद्र म्हणून खुले होत आहे. उद्योगांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी या लॅबमध्ये विश्लेषण आणि उत्पादन विकासच्या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साधने ठेवण्यात आली आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे