प्रहार शेतकरी संघटनेचे 10 नोव्हेंबर पासून जातेगाव येथील ठिय्या आंदोलन सुरू अधिकार्यांचे दुर्लक्ष
नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील ढेकू ते बोलठाण रस्ता अत्यंत दयनीय झाला असून जातेगाव येथील खरोळा नदीवरील पूल ढसाळलेला असल्याने येथे अगोदर दोन जणांचा जीव गेले असून देखील या पुलाचे काम करण्यात आली नसल्याने व सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव यांना निवेदन देऊन देखील दखल न घेतल्याने दिनांक 10 डिसेंबर 2021 शुक्रवारपासून जातेगाव येथील खरोळा नदीवरील पुलाजवळ प्रहार शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सूर्यवंशी व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून अधिकाऱ्यांचे अद्याप लक्ष नाही.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव यांना प्रहार शेतकरी संघटने मार्फत निवेदन देण्यात आले असून या निवेदनात ढेकू ते बोलठाण रस्त्याचे काम मागील दोन ते तीन वर्षापासून अपूर्ण स्थितीत होते. ते काम मागील आठ दिवसापासून झालेली आहे. वरील काम शासनाच्या अंदाजपत्रकानुसार चालू नसून केवळ जनतेची दिशाभूल करून शासनाचा निधी हडप करण्याचे काम चालू आहे.
तसेच जातेगाव ते बोलठाण या रस्त्यावरील खरोळी नदीवरील प्रलंबित पुलाचे काम अजूनही सुरू झाली नाही. या कामाची तात्काळ चौकशी करून ते काम अंदाजपत्रकानुसार तात्काळ करून घेण्यात यावे. आणि तात्काळ सदर ठेकेदाराने विरुद्धकारवाई करावी.तसे न झाल्याने जातेगाव ते बोलठाण त्यावर 10 डिसेंबर 2021 शुक्रवारपासून आंदोलन करण्यास सुरुवात शेतकरी प्रहार संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सूर्यवंशी आणि चंद्रभान झोडगे, जनार्दन भागवत, ईश्वर जाधव, रवी भागवत, प्रकाश चव्हाण, श्रीराम जाधव,
ममराज भडाळे, महेश पवार, नामदेव वाघ, रोहित माळी आदींनी आंदोलन सुरू केले असून बोलठाण आऊट पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगुर्डे, प्रदीप बागुल या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा