दिव्यांग बांधव त्यांच्या पाच टक्के हक्काचा निधी पासून वंचित! जळगाव जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली तक्रार!
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात चौकशी केली असता भरपूर ग्रामपंचायतींनी तो निधी दिव्यांग बांधवांवर खर्च केलेलाच नाहीये.
दिव्यांग बांधव त्यांच्या पाच टक्के हक्काचा निधी पासून वंचित! जळगाव जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली तक्रार!
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वताच्या उत्पन्नातुन शासकीय आदेशानुसार ३/५ टक्के निधी दिव्यांग बांधवांवर खर्च करायचा असतो अथवा वाटप करायचा असतो. परंतु आपल्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात चौकशी केली असता भरपूर ग्रामपंचायतींनी तो निधी दिव्यांग बांधवांवर खर्च केलेलाच नाहीये. सन २०११ पासून ३% आणि २०१८ पासून ५% प्रमाणे निधी दिव्यांग बांधवांवर खर्च करायचा असतो.

परंतु भरपूर ग्रामसेवक वसुली झाली नसल्याचे कारण पुढे करून कामचुकारपणा करत आहेत. आणि दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काच्या निधी पासून जाणीव पूर्वक वंचित ठेवत आहेत. हया बाबत वरिष्ठ अधिकारी देखील गांभीर्याने घेतांना दिसत नाहीत. दिव्यांग आयुक्तालय पुणे यांच्या आदेशानुसार दर वर्षी हा निधी वाटप करुन जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून अहवाल सादर करायचा असतो. परंतु काही ठिकाणी तसे होतांना दिसत नाहीये. दिव्यांग बांधव हे समाजातील दुर्बल घटक आहेत. आणि भरपूर लोक त्यांच्या उदरनिर्वाह स्वता करु शकत नाहीत. अशा लोकांना हा हक्काचा निधी त्यांच्या अडीअडचणीत उपयोगी पडत असतो. शासन त्यांना त्यापासून देखील वंचित ठेवत आहे.
या महत्त्वाच्या आणि दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कांच्या विषयाला अनुसरून काल सामाजिक कार्यकर्ते मा. मुरलीधर परदेशी, आखतवाडे. जळगाव जिल्हा.यांनी मा.जिल्हा अधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रार दाखल करुन दिव्यांग निधी वाटपाबाबत न्याय मागितले आहे.



