रामायण, महाभारतात विविध राजांचे दाखले दिले जातात. हे राजे शूरवीर होतेदार होते न्याय होते महान पराक्रमी राजांची परंपरा आपल्याला लाभली असली तरी रयतेचा राजा असे म्हटलं की समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कुठलं नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि त्यापुढे जाण्याची कोणाची टाप नाही. महाराजांवर प्रेम करणारे लाख तर कोट्यावधींच्या संख्येने गणता येतील. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. शहरभर मोठमोठे होर्डिग्ज उभारून रायतेच्या या पोशिंद्याला अभिवादन केले असले तरी तुरळक उत्साही मंडळींनी मात्र आपल्या छायाचित्रापेक्षाही मोठ्या किंवा बरोबरीत लावण्याचा अट्टहास केला आहे. या उत्साहामुळे मात्र आहे. याला काही मंडळी अपवाद देखील आहेत.



