आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जाची सुरवात झाली

झूम मराठी

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक  प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार 16 फेब्रुवारी  पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते.

आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज 16 फेब्रुवारी 2022 पासून भरता येतील, संबंधितांनी याची नोंद घेऊन अर्ज दाखल करावेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (Right to Education Act) 2009 कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

अर्जासाठी लागणारे कागद पत्र – पत्त्याचा पुरावा, जन्मतारीख प्रमाणपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र,अपंगत्व प्रमाणपत्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे