आपल खान्देश

नुकसानग्रस्ताना तातडीने मदत करण्यासाठी प्रयत्नशिल – कृषीमंत्री दादा भुसे

नुकसानीच्या निकषानुसार तातडीने मदत करण्यासाठी प्रयत्नशिल कृषीमंत्री दादा भुसे.परंतु पिक विम्या संदर्भात केंद्राकडुन सहकार्य मिळत नाही, पत्रकार परिषदेत दिली माहिती.


झूम मराठी पाचोरा

दिनांक~१२/०९/२०२१

राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या ८ दिवसात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्याकाकडुन तातडीने पंचनामे करून नुकसानीच्या निकषानुसार तातडीने मदत केली जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.आ.पाटील यांच्या “शिवालय” निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.या महिन्यात पाचोरा तालुक्याच्या वरील भागात जोरदार ढगफुटी झाल्याने नद्या नाल्यांना महापुर येवुन शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पाणी शिरल्याने पाचोरा, भडगाव तालुक्यातील सुमारे १२५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. काही पाणी शेतातुन खरडुन निघाल्याने जमिनी वाहुन गेल्या आहेत. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिके कुजु लागली असुन अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

याशिवाय काही ठिकाणी जिवितहानी झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांची गुरे ढोरे वाहुन गेली असुन या भागात विज वितरण कंपनी, जिल्हा परिषद, व सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते वाहुन गेल्याने मोठे नुकसान होवुन अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. सतत पाऊस, ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे