आपल खान्देशकृषीवार्ता

अवकाळी पावसाने बळीराजा संकटात, वादळात दादर,बाजरी, गहू, हरभरा जमीनदोस्त..!

ज्वारी गहू आदी पिके जमीनदोस्त झाले असून कापून ठेवलेले ज्वारीच्या कणसांना रात्रीत झालेल्या पावसामुळे रात्रभर भिजली असून शेतकरी हवालदिल झाला


सोयगांव (प्रतीनीधी) दि.९ सोयगांव तालुका :घोसला शिवारात झालेल्या विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शेतशिवारातील शेकडो हेक्टरवरील दादर, हरभरा, गहू मका कांदा व इतर पिके जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे खरीप हंगांमासोबतच आता रब्बीचे उत्पन्न देखील निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावून घेतला आहे.

सोयगाव तालुक्यातील घोसला ,नांदगाव ,तिडका ,निमखेडी या पंचक्रोशीतील शेती शिवारात ज्वारी दादर हरभरा गहू व कांदा सीड्स जमीनदोस्त झाली आहे यामुळे खरीप हंगामा सोबतच आता रब्बीचे उत्पन्नदेखील निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावून घेतला आहे शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट ओढवले आहे.

शेतकरी पुन्हा संकटात यावर्षी अधिक हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यानंतर रब्बीचा हंगाम तरी पदरी पडेल या आशेने बसलेल्या शेतकरी वर्गाला निसर्गाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा देत आणि तोंडात आलेला घास हिसकावून घेतला आहे.

ज्वारी गहू आदी पिके जमीनदोस्त झाले असून कापून ठेवलेले ज्वारीच्या कणसांना रात्रीत झालेल्या पावसामुळे रात्रभर भिजली असून शेतकरी हवालदिल झाला आहे तहसील विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढण्यास सहकार्य करावे ,अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील पिक विमा व नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असताना अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे ची वेळ प्रशासनावर आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे