ब्रेकिंग
मुंबईत रात्रभर पाऊस, सहा जणांचा मृत्यू!!
एस.म्हात्रे
मुंबई व उपनगर परिसरात पुढील दोन ते तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आवशकता नसेल तर घराबाहेर पडू नका अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
शनिवारी रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावत मुंबईकरांची चांगलीच झोपमोड केली. रात्री 12 नंतर पावसाचा जोर वाढत गेला तो पहाटे पाच वाजेपर्यंत कोसळत होता. मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागांत विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप, अंधेरी, बोरिवली, कांदिवली या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे. विक्रोळी येथील डोंगरळ भाग असलेल्या पंचशीलनगरमध्ये घराचा छत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.डोंगराळ वस्तीमध्ये एका घरावर दुसरे असे तीन-चार घरे एकमेंकावर कोसळली आहेत. या मलब्याखाली तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मृतामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. चेंबूरमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त मिळाले आहे. चेंबूर आरसीएफ भारत नगर येथे घर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मृताची संख्या आणखी वाढू शकते. NDRF चे पथक घटनास्थळी पोहचलं असून बचावकार्य वेगात सुरु आहे.
सध्या पावसाने उसंत घेतली आहे. मात्र, पुढील दोन ते तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आवशकता नसेल तर घराबाहेर पडू नका अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. शनिवापप्रमाणेच मुंबईत पावसाचा जोर राहिला तर रविवारी शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपग्रह चित्रात मुंबई, ठाण्यासह कोकणात ढगांची दाटी दिसत असून द. मध्य महाराष्ट्रातही मोठे ढग दिसत आहेत, असे ट्विट हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी शनिवारी रात्री केले होते.



