आपल खान्देशकृषीवार्ता
दुबार पेरणीचे संकट, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खासदार रक्षा खडसेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
ZOOM MARATHI NEWS WEB MEDIA
उत्तर महाराष्ट्र मध्य सुरूवातीला पावसाला चांगली सुरूवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी केली. पण आता पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. जळगांव व बुलडाणा जिल्ह्यात वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे कुठेही पाऊस झालेला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण आता जुलै महिना उजाडला तरीसुद्धा अजून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पावसा अभावी नाईलाजास्तव शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. तरी शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध द्या तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करावे, असे पत्र भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना पाठवले आहे.



