जळगाव जिल्यातील बिलवाङी (पहुर ) व टोळी (पारोळा ) येथील पिङीत आत्याचार कुटुंबांला संरक्षण आर्थिक मदत व पुनर्वसन करुन न्याय देण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन!!
जळगाव जिल्ह्यातील चर्मकार पिङीत आत्याचार कुटुंब जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी बिलवाडी येथील मतिमंद मुलीवर झालेला अत्याचार तसेच वडगाव टिघ्रे येथील समाज बांधव यांना झालेली मारहाण,तसेच पारोळा तालुक्यातील टोळी गावातील तरुणीवर झालेला अत्याचार झालेल्या कुटुंबाना संरक्षण, आर्थिक मदत व पुनर्वसन व्हावे करीता चर्मकार विकास संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजयजी खामकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला व संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे नोंदविण्यात आले मात्र कङक शिक्षा झाली पाहिजे व पीडित कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे करीता आज रोजी इंटकचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी प्रदेशाध्यक्ष चर्मकार ऐक्य परिषद माजी अध्यक्ष लक्ष्मणरावजी घुमरे, धारावी चे माजी आमदार बाबुरावजी माने, ऐक्य परिषदचे अध्यक्ष रविकिरण घोलप , मा. मनोज भाऊ सोनवणे खानदेश प्रदेश अध्यक्ष चर्मकार विकास संघ जळगाव जिल्हा, मा. सुखदेव काटकर सर विभागिय अध्यक्ष मराठवाडा अहमदनगर तालुका अध्यक्ष, मा. विश्वनाथ सावकारे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य , जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष मा.अँङ चेतन तायडे ,सचिव प्रा. धनराज भारुडे, ज्येष्ठ सल्लागार आर. आर. सावकारे, यांनी मा. जिल्हाधिकारी अभिजीतजी राऊत साहेब यांना निवेदन देऊन पीडित कुटुंबांना आर्थिक मदत, पुनर्वसन व संरक्षण देण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला व गुन्हेगारांना कङक शासन करण्याचे अश्वासन मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी दिले. लवकरच पिङीत कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देऊन त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करणार असल्याचे सांगितले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा