शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन,

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठवाड्यातील बीड जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत त्या अनुशंगाने बैठक बोलावली होती यातच खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज व इतर काही अडचणी आहेत का यावर चर्चा करून शेतकऱ्यांच्या अडचणी येणार नाहीत असे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय शिक्षण ग्रामविकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग पोलीस विभाग यासाठी भरतीची परवावानगी देण्यात आली आहे. बीडचा पीक विमा पॅटर्न चांगला असल्याने आम्ही केंद्राकडे हा राज्यात सुरु करण्याची विनंती केली मात्र या वर्षी ते होऊ शकलं नाही, असं ते म्हणाले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा